Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थायरॉईड असेल तर कोणत्या भाज्या आणि फळं खाणं धोक्याचं, काय खाणं तब्येतीसाठी फायद्याचं..

थायरॉईड असेल तर कोणत्या भाज्या आणि फळं खाणं धोक्याचं, काय खाणं तब्येतीसाठी फायद्याचं..

Thyroid Food Tips : काही पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर असते, तर काही पदार्थ टाळणे गरजेचे असते. अशात जाणून घेऊया की. थायरॉईडची समस्य असल्यावर काय खाणे टाळावे आणि काय खावे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:58 IST2026-03-02T10:39:29+5:302026-03-02T14:58:08+5:30

Thyroid Food Tips : काही पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर असते, तर काही पदार्थ टाळणे गरजेचे असते. अशात जाणून घेऊया की. थायरॉईडची समस्य असल्यावर काय खाणे टाळावे आणि काय खावे.

Foods to eat and avoid in Thyroid you should know | थायरॉईड असेल तर कोणत्या भाज्या आणि फळं खाणं धोक्याचं, काय खाणं तब्येतीसाठी फायद्याचं..

थायरॉईड असेल तर कोणत्या भाज्या आणि फळं खाणं धोक्याचं, काय खाणं तब्येतीसाठी फायद्याचं..

 Thyroid Food Tips :  खाण्या - पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल अनेक आरोग्य समस्या वाढताना दिसत आहेत. खासकरून महिलांमध्ये थायरॉईडची समस्या अधिक प्रमाणात आढळते. थायरॉईडच्या उपचारासाठी डॉक्टर रुग्णाला औषधे देतात. रुग्ण रोज औषधे घेतो, पण अनेकदा तरीही थायरॉईडमध्ये हवा तसा बदल दिसून येत नाही. याचं कारण म्हणजे औषधांसोबत आहारातही योग्य बदल करणं आवश्यक असतं. काही पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर असते, तर काही पदार्थ टाळणे गरजेचे असते. अशात जाणून घेऊया की. थायरॉईडची समस्य असल्यावर काय खाणे टाळावे आणि काय खावे.

थायरॉईडमध्ये काय खाऊ शकतो?

भाज्यांमध्ये दुधी भोपळा, दोडका, परवल, भोपळा, गाजर, बीन्स आणि हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. या सर्व भाज्या हलक्या आणि पचायला सोप्या असतात. फळांमध्ये डाळिंब, पपई, सफरचंद, नाशपाती आणि पेरू यांचे सेवन करू शकता. खाद्यतेलांच्या बाबतीत चांगल्या दर्जाचे तेल वापरणे महत्त्वाचे आहे. आहारात देशी तूप, खोबऱ्याचं तेल आणि मोहरीचे तेल वापरू शकता.

डाळींमध्ये हलक्या आणि सहज पचणाऱ्या डाळी खाणे योग्य ठरते, जसे मुगाची डाळ, मसूर डाळ आणि कुळीथ डाळ. या डाळी पचायला सोप्या असतात आणि शरीराला आवश्यक प्रथिने देतात.

काय खाऊ नये?

काही खाद्यपदार्थ थायरॉईडवर थेट परिणाम करतात. खासकरून गाठीच्या भाज्या टाळण्याचा सल्ला दिला जातो. थायरॉईडमध्ये कोबीसारख्या भाज्या आणि सोयाबीन खाणे टाळावे, कारण त्या पचायला जड असतात आणि कफ वाढवू शकतात. फळांमध्ये केळी, आंबा, चिकू आणि द्राक्षे कमी खाण्याचा किंवा टाळण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय वारंवार गरम केलेले तेल, शेंगदाणा तेल आणि रिफाइंड तेल आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. डाळींमध्ये राजमा, छोले आणि सोया चंक्स खाणे टाळावे असेही सांगितले जाते.

Web Title : थायराइड: बेहतर स्वास्थ्य के लिए क्या खाएं और क्या न खाएं

Web Summary : थायराइड के रोगियों को लौकी, गाजर, दाल और अनार व सेब जैसे फल खाने चाहिए। पत्तागोभी, सोयाबीन, केले, आम और दोबारा गरम तेलों से बचें। खाना पकाने के लिए घी, नारियल या सरसों का तेल चुनें।

Web Title : Thyroid: Foods to Eat and Avoid for Optimal Health

Web Summary : Thyroid patients should prioritize easily digestible foods like gourds, carrots, lentils, and fruits like pomegranate and apples. Avoid cabbage, soybean, bananas, mangoes, and reheated/refined oils. Choose ghee, coconut, or mustard oil for cooking.