Join us   

उन्हात न जाता व्हिटामीन डी कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना येईल भरपूर ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:56 AM

Foods For Vitamin D : व्हिटामीन कॅल्शियम आणि फॉस्फेटसहसह असते ज्यामुळे हाडं निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते.

व्हिटामीन डी शरीराच्या चांगल्या कार्यासाठी फार महत्वाचे असते. (Vitamin D) व्हिटामीन डी च्या  कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ लागतात आणि बोन्स डेंसिटी कमी होते. (Health Tips) व्हिटामीन हाडांसह दातांच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते. व्हिटामीन कॅल्शियम आणि फॉस्फेटसह असते ज्यामुळे हाडं निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते. (Health Tips)

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास थकवा येणं, हेअर लॉस, भूक कमी होणं, केस गळणं, डिप्रेशन, झोप कमी येणं, विकनेस येणं, त्वचा पिवळी पडणं अशा समस्या उद्भवतात. (Best Foods For Vitamin D)  व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

व्हिटामीन डी चा प्राकृतिक स्त्रोत सुर्याची किरणं आहेत पण गरमीच्या वातावरणात उन्हात बसणं शक्य नसते. अशा स्थितीत व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. (How To Get Vitamin D)

1) दही

गाईच्या दुधापासून तयार झालेल्या दह्याचे सेवन केल्याने व्हिटामीन  डी मिळते. शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास ताज्या दह्याचे सेवन करायला हवे.  जे तुमच्या पोटासाठी फायदेशीर ठरते.  याव्यतिरिक्त दूध, पनीर आणि योगर्ट व्हिटामीन डी चा एक चांगला स्त्रोत आहे.

2) पालक

पालकात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटामीन्स असतात यात एक व्हिटामीन डी असते. पालकात प्रोटीन्स, आयर्न, व्हिटामीन आणि मिनरल्स असतात. पालकात अल्फा लिपोइक एसिड असते. ज्यात एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो. 

3) गाजर

व्हिटामीन डी चा गाजराचा आपल्या आहारात समावेश करा. यात व्हिटामीन सी आणि इतर पोषक तत्व असतात. गाजरात फॅट्सचे प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस प्यायल्यानं गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. व्हिटामीन सी मुळे शरीराला पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत.

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स