lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात फूड इन्फेक्शन- ॲलर्जीचा त्रास? ४ उपाय, पाेटाच्या समस्या होतील दूर, तज्ज्ञांचा सल्ला..

पावसाळ्यात फूड इन्फेक्शन- ॲलर्जीचा त्रास? ४ उपाय, पाेटाच्या समस्या होतील दूर, तज्ज्ञांचा सल्ला..

How Can We Prevent Food Infection: फूड इन्फेक्शन आणि त्यामुळे होणारे पोटाचे आजार, हे आपण पावसाळ्यात वारंवार ऐकताे. आपल्याला स्वत:ला किंवा घरातल्या लोकांना हा त्रास होताेच. म्हणूनच तर हे काही उपाय करून बघा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 01:14 PM2022-07-18T13:14:45+5:302022-07-18T13:15:33+5:30

How Can We Prevent Food Infection: फूड इन्फेक्शन आणि त्यामुळे होणारे पोटाचे आजार, हे आपण पावसाळ्यात वारंवार ऐकताे. आपल्याला स्वत:ला किंवा घरातल्या लोकांना हा त्रास होताेच. म्हणूनच तर हे काही उपाय करून बघा. 

Food infection in rainy season- How to avoid food infection or food poisoning in Monsoon or Rainy season? | पावसाळ्यात फूड इन्फेक्शन- ॲलर्जीचा त्रास? ४ उपाय, पाेटाच्या समस्या होतील दूर, तज्ज्ञांचा सल्ला..

पावसाळ्यात फूड इन्फेक्शन- ॲलर्जीचा त्रास? ४ उपाय, पाेटाच्या समस्या होतील दूर, तज्ज्ञांचा सल्ला..

Highlightsपावसाळ्यात फूड इन्फेक्शन झालंय किंवा मग एखाद्या पदार्थाच्या ॲलर्जीमुळे पाेट दुखतंय, असं त्रास वारंवार जाणवू लागतो. म्हणूनच पावसाळ्यातलं हे फूड इन्फेक्शन टाळण्यासाठी हा खास सल्ला.....

पावसाळ्यात आधीच आपला जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे काही पदार्थ पचतात (digestion issues in monsoon) तर काही पदार्थांचा खूपच त्रास होतो. जे पदार्थ एरवी उन्हाळ्यात, हिवाळ्यात आपण आरामात खातो, ते पदार्थ नेमके पावसाळ्यात (how to stay safe and healthy in monsoon?) पोटदुखी, फूड इन्फेक्शन (food infection and food poisoning) या त्रासांसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे पावसाळ्यात फूड इन्फेक्शन झालंय किंवा मग एखाद्या पदार्थाच्या ॲलर्जीमुळे पाेट दुखतंय, असं त्रास वारंवार जाणवू लागतो. म्हणूनच पावसाळ्यातलं हे फूड इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारातज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी इन्स्टाग्रामद्वारे दिलेला हा खास सल्ला. (how to take care about food in monsoon?)

 

फूड इन्फेक्शन टाळण्यासाठी..
१. बाहेरचं खाणं टाळा

पाेटदुखी, डायरिया, मळमळणे, उलट्या, जुलाब अशा वेगवेगळ्या प्रकारे फूड इन्फेक्शनचा त्रास होतो. पावसाळ्यात हा त्रास टाळायचा असेल तर सगळ्यात सोपा आणि आपल्या सगळ्यांना माहिती असणारा एक सोपा उपाय म्हणजे पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाण्याचा मोह टाळणे. कारण या दिवसांत दुषित पाण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खायचेच असतील तर ते बनवणाऱ्यांनी योग्य स्वच्छता पाळली आहे का, याची आधी खात्री करा. 

 

२. बाॅडी डिटॉक्स
वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आपल्या शरीरात नेहमीच काही विषारी पदार्थ जात असतात. किंवा आपण खाल्लेल्या ग्लुटेन, लॅक्टोज आणि काही प्रोटीन्सचे व्यवस्थित पचन न झाल्याने शरीरात टॉक्झिन्स तयार होतात. त्यांचा त्रास जाणवत नसला तरी ते शरीरात स्टोअर केले जातात.

साधाच तर थंडी-ताप असं म्हणून अंगावर काढू नका, सर्दी-खोकला-तापाकडे पावसाळ्यात दुर्लक्ष धोक्याचं  

हे पदार्थ जेव्हा जास्त होतात तेव्हा फूड इन्फेक्शन, पोटदुखी, मळमळ असा त्रास उफाळून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत साधारण महिन्यातून दोन वेळा बॉडी डिटॉक्स करा. यासाठी एखादा दिवस हलके पदार्थ कमी प्रमाणात खाणे, खूप पोटभर जेवण न करणे किंवा मग डिटॉक्स ड्रिंक्स घेण्याचा उपाय करता येईल. 

 

३. व्यवस्थित झाकण ठेवा
बाहेरचं तर काही खाल्लं नाही, घरचं पाणी पण शुद्ध आहे किंवा प्युरीफाईड आहे. तरीही फूड इन्फेक्शनचा त्रास होतोय... असा अनुभव अनेकांना येतो. अशा केसमध्ये फूड इन्फेक्शन होण्याचं सगळ्यात मुख्य कारण असतं ते घरातले पदार्थ व्यवस्थित झाकूण ठेवलेले नसणं. पावसाळ्यात घरात माशा खूप होतात. अन्नपदार्थ थोडा जरी उघडा राहिला तरी त्यावर माशा बसतात. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

 

४. कच्चे पदार्थ खाऊ नका
सलाड, कडधान्य किंवा काही भाज्या कच्च्या खाल्ल्या तर त्या पचायला थोड्या जड असतात. पावसाळ्यात असे पदार्थ कच्चे खाण्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय पावसाळ्यात त्यांच्यावरच्या बॅक्टेरियांचं प्रमाणही वाढलेलं असतं. त्यामुळे या दिवसांत शक्यतो कच्चे पदार्थ खाणं टाळावं. फुलकोबी, पालक आणि इतर पालेभाज्या, ब्रोकोली किंवा कच्चे सलाड खायचेच असेल तर ते सगळे पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यावेत. स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करावेत आणि नंतरच खावे.   

 

Web Title: Food infection in rainy season- How to avoid food infection or food poisoning in Monsoon or Rainy season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.