Join us   

अक्षयकुमारची 'ही' चांगली सवय आपल्याला लागली तर तब्येतीच्या अर्ध्या तक्रारी जातील- वाचा नेमकं काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2024 5:18 PM

Fitness Tips Given By Akshay Kumar: अभिनेता अक्षयकुमार याने त्याचा फिटनेस मंत्र शेअर केला आहे. बघा यामध्ये तो नेमकं काय सांगत आहे. (Akshay Kumar's fitness secret)

ठळक मुद्दे ही एक अगदी साधी आणि सोपी गोष्ट आपल्या आरोग्यासाठी करणं खरंतर प्रत्येकाला शक्य आहे. अक्षयकुमारसारखा व्यक्ती ते करू शकतो, तर आपण का नाही?

बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी असे आहेत की त्यांच्या फिटनेसचा किंवा ते फिटनेस जपण्यासाठी काय काय करतात याचा अजिबात गाजावाजा नसतो. पण तरीही ते त्यांच्या तब्येतीबाबत, फिटनेसबाबत खूप जागरुक असतात आणि त्याचं रुटीन ते अगदी काटेकोरपणे पाळत असतात. अभिनेता अक्षयकुमारही त्यापैकीच एक आहे. फिटनेस जपण्यासाठी त्याने स्वत:ला काही सवयी लावून घेतल्या आहेत आणि कितीही काही झालं तरी तो त्याच्या रुटीनमध्ये सहसा खंड पडू देत नाही (Akshay Kumar's fitness secret). अशाच त्याच्या एका चांगल्या सवयीविषयी सांगणारा त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (importance of sleeping early in night)

 

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार सांगतो की त्याला बहुतांश लोक हा प्रश्न विचारतात की मी रात्री ९: ३० वाजताच का झोपतो. यावर मी त्यांना उलट प्रश्न विचारतो की मी ९: ३० वाजताच का झोपू नये लहानपणापासून मी माझ्या आई- वडिलांकडून तेच शिकत आलो आहे.

कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

रात्री लवकर झोपण्याची सवय लहानपणी प्रत्येकालाच असते. पण आपण आपल्या शरीराला बिघडवलं. रात्री १२ च्या नंतर झोपणं आपल्याला कूल वाटू लागलं. रात्री लवकर झाेपणं आणि पहाटे लवकर उठणं आपल्याला का जमत नाही? असा उलटप्रश्न अक्षयने विचारला आहे. 

 

रात्री लवकर झाेपलं तर झोप पूर्ण होते, हार्मोन्सचे संतुलन चांगले राहते. त्यामुळे मेंदू आणि शरीराचा पूर्ण आराम झाल्याने त्वचा- केस यांच्या समस्यांपासून ते हृदय- मेंदू यांच्या आरोग्यापर्यंत सगळेच शरीर उत्तम राहण्यास मदत होते.

Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते.... 

ही एक अगदी साधी आणि सोपी गोष्ट आपल्या आरोग्यासाठी करणं खरंतर प्रत्येकाला शक्य आहे. अक्षयकुमारसारखा व्यक्ती ते करू शकतो, तर आपण का नाही करू शकत?

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/413757817829662/}}}}

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअक्षय कुमार