रोजचा स्वयंपाक करताना किंवा घाई - गडबडीत किचनमध्ये अनेकदा लहान - मोठे अपघात होतंच असतात. काहीवेळा आपला हात चुकून कापला जातो किंवा भाजला जातो. किचनमध्ये रोजचा स्वयंपाक करताना अशा गोष्टी होणे फारच कॉमन असले तरी देखील याचा थोडाफार त्रास होतोच. गरम तेल, उकळते पाणी, किंवा गरम भांड्याचा स्पर्श यामुळे त्वचेवर थोड्याफार प्रमाणात भाजतेच. अशावेळी (The Right Way to Treat Burns) योग्य प्रकारे केलेला प्राथमिक उपचार हा केवळ वेदना (First Aid Treatment for Burns) कमी करत नाही, तर पुढील गंभीर त्रासही टाळतो. अशा परिस्थितीत, लगेच दवाखान्यात जाणे शक्य नसले तरी, घरच्याघरीच काही सोप्या आणि परिणामकारक उपायांनी प्रथमोपचार करता येतो. यामुळे वेदना कमी होतात आणि त्वचेची होणारी हानीही टाळता येते(Tips & Tricks Applying Ice On Burns Is Dangerous Doctor Explains Proper First Aid If You Burn From Gas Or Hot Things).
या प्रथमोपचार पद्धतीमध्ये, सर्वातआधी भाजलेल्या ठिकाणची जळजळ, आग शांत होण्यासाठी आपण बर्फ लावतो. असे असले तरी डॉक्टरांच्या मते, ही एक मोठी चूक आहे. बर्फामुळे जळलेल्या भागावर तात्काळ आराम मिळू शकतो, परंतु त्यामुळे त्वचेच्या ऊतींना आणखी नुकसान होऊ शकते. प्रसिद्ध डॉक्टर अग्नि बोस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर भाजलेल्या जखमांवर प्रथमोपचार करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत, त्या टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहूयात.
डॉक्टर सांगतात, भाजलेल्या भागांवर प्रथमोपचार म्हणून काय करावे?
प्रसिद्ध डॉक्टर अग्नि बोस यांच्या मते, जर एखाद्याचा हात किंवा शरीराचा कोणताही भाग जळाला तर लगेच बर्फ लावण्याऐवजी तो भाग स्वच्छ, थंड आणि वाहत्या पाण्याखाली १० मिनिटे धरून ठेवावा. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावरील उष्णता हळूहळू कमी होते आणि जळजळीचा परिणाम देखील कमी होऊ शकतो. थंड पाणी केवळ आराम देत नाही तर त्वचेला पुढील नुकसान होण्यापासून वाचवते.
मासिक पाळीत पोट खूप जास्त दुखते ? करा १ सोपं आसन - पोटदुखी थांबून मिळेल आराम...
डॉ. बोस सांगतात की, जळालेल्या भागावर बर्फ लावण्याची चूक कधीच करु नका. कारण त्यामुळे त्वचा जळू शकते आणि जळण्याची खोली अधिक जास्त वाढू शकते. त्याऐवजी, जळलेल्या भागावर मुपिरोसिन किंवा फ्युसिडिक ॲसिड असणारी अँटीबायोटिक क्रीम लावणे हा योग्य पर्याय आहे. या क्रीम्स संसर्ग रोखतात आणि बरे होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करतात.
जळालेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचा लेप लावतानाही काळजी घेतली पाहिजे. बरेचदा लोक कापसाचा वापर करतात, पण असे करू नये. कापूस जळलेल्या भागाला चिकटू शकतो आणि जखम काढताना ती खराब करू शकतो. त्याऐवजी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले गॉझ वापरा. जखम झाकणे अधिक सुरक्षित असते आणि संसर्गापासून देखील संरक्षण करते.
सकाळी पोट साफ होत नाही? रोज रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर दह्यात कालवून ‘हा’ पदार्थ खा, त्रास कमी...
जर जळलेल्या ठिकाणी फोड आले असतील तर ते कधीही स्वतःहून फोडू नका. हे फोड शरीराचे नैसर्गिक संरक्षक कवच आहेत जे जखमेचे बाह्य संसर्गापासून संरक्षण करतात. त्या फोडल्याने संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो. जर फोड खूप मोठा असेल किंवा असह्य वेदना देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ड्रेसिंग करताना जर पट्टी ओली झाली तर घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त ती पट्टी हळूवारपणे काढा आणि स्वच्छ करा आणि दररोज ड्रेसिंग बदलत रहा. योग्य स्वच्छता आणि नियमित काळजी घेतल्यास, जळलेल्या जखमा लवकर बऱ्या होतात आणि व्रण पडण्याची शक्यता देखील कमी होते.