Join us

पोट सुटलंय-जाड कंबरेमुळे फिगर बिघडली? उपाशी पोटी या बियांचे पाणी प्या, १५ दिवसांत दिसेल बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:22 IST

Fenugreek Seeds For Weight Loss : रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यानं लठ्ठपणा कमी होतो. याशिवाय शरीरात एक्स्ट्रा चरबी जमा होत नाही.

वजन कमी (Weight  Loss) करण्यात खाणं पिण्यासोबतच, व्यायाम  यांसारखे उपाय केल्यास मेटाॉलिझ्म वाढण्यास मदत  होते. या तिन्ही गोष्टींचा बॅलेन्स व्यवस्थित होते तेव्हा लठ्ठपणा कमी होऊ  लागतो. हा उपाय करण्यासाठी तुम्ही पिवळ्या मेथीच्या बियांचा वापर करू शकता. (Fenugreek Seeds Soaked In Water Overnight Drink In Morning Effective In Weight) ज्यामुळे वजन कमी करण्यापासून  शुगर  कंट्रोल करण्यापर्यंत अनेक फायदे मिळतात. मेथीचे सेवन केल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो. (Fenugreek Seeds For Weight Loss)

वजन सहज कमी होतं. मेथी प्रत्येकाच्याच घरांत मसाल्यांच्या स्वरूपात वापरली जाते. मेथीचे आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे. सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यासाठी मेथीचे सेवन केले जाते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवत नाही. (Fenugreek Seeds Soaked In Water Overnight Drink In Morning Effective In Weight Loss Belly Fat)

मुलांचा मेंदू शार्प होण्यासाठी ४ मेमरी गेम्स; स्मरणशक्ती वाढेल-परीक्षेत पेपर जाईल सोपा

उपाशीपोटी मेथीच्या बियांचे पाणी  पिण्याचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यानं आरोग्याला बरेच फायदे मिळतात. जे लोक सकाळी चहा किंवा कॉफी ऐवजी मेथीचे पाणी पितात त्यांना अनेक फायदे मिळतात. रोज मेथीचे पाणी प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहते. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि वजन कमी करणं सोपं होतं.

मेथीच्या बियांमधील पोषक तत्व

मेथीच्या बियांमध्ये सोडियम, जिंक, फॉस्फरस, फॉलिक एसिड, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व असतात. याशिवाय मेथीत व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. मेथीच्या बियांत फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय प्रोटीन्स, स्टार्च शुगर, फॉस्फरिक एसिडही असते.

जेवणात १ वाटी ही डाळ खा, बॅड कोलेस्टेरॉल घटेल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, वजन भराभर घटेल

वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी ठरते उत्तम

रात्रभर १ ग्लास पाण्यात १ चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी हलकं गरम करून गाळून पाण्याचे सेवन करा. पाण्यात भिजवल्यानंतर मेथीचा कडवटपणा निघून जाईल. या पाण्यासोबतच मेथीचे दाणेसुद्धा तुम्ही खाऊ शकता.  १५ दिवस हा उपाय केल्यास वजन वेगानं कमी होऊ लागेल.

रिकाम्यापोटी मेथीचे पाणी पिण्याचे फायदे

रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यानं लठ्ठपणा कमी होतो. याशिवाय शरीरात एक्स्ट्रा चरबी जमा होत नाही. मेथीमुळे पचनक्रिया चांगली राहते. गॅसेसची समस्या उद्भवत नाही. डायबिटीसच्या रुग्णांनी मेथीचे सेवन केल्यानं शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.  याव्यतिरिक्त हार्ट बर्नची समस्या उद्भवत नाही. मेथीचे पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल