Why Do I Need To Poop Right After Eating: बऱ्याचदा असं बघायला मिळतं किंवा आपल्यासोबतही घडलं असेल की, जेवण केल्या केल्या टॉयलेटला जाण्याची इच्छा होते. कधी कधी तर असंही वाटतं की, जे खाल्लं ते पोटातून थेट बाहेर पडत आहे. पण मुळात असं होत नसतं. मुळात असं होण्यामागे शरीराची एक नॅचरल प्रक्रिया काम करत असते. ज्याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. हा डायजेशन सिस्टीमचा एक कॉमन संकेत असतो. जो आतडीला सांगतो की, नवीन अन्न पोटात पोहोचलंय, त्यामुळे वेस्ट पोटातून बाहेर काढण्यासाठी तयार रहा. ही एक सामान्य प्रक्रिया असते, पण प्रत्येक व्यक्तीवर याचा प्रभाव वेगवेगळे होऊ शकतो.
गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणजे काय?
clevelandclinic नुसार, गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स पोट आणि मोठ्या आतडीमध्ये होणारं एक नॅचरल कम्युनिकेशन आहे. जेव्हा अन्न पोटात पोहोचतं, तेव्हा नसा मोठ्या आतडीच्या स्नायूंना संकेत पाठवतात. त्यानंतर आतडीची हालचाल सुरू होते आणि टॉयलेटला जाण्याची इच्छा जाणवते. याचा अर्थ असा होतो की, नवीन अन्न पचनासाठी जागा तयार व्हावी आणि जुनं वेस्ट शरीरातून बाहेर पडावं.
कशी होते ही प्रक्रिया?
या प्रक्रियेमध्ये डायजेशन सिस्टीमचे वेगवेगळे अवयव मिळून काम करतात. पोट अन्न तोडण्याची प्रक्रिया सुरू करतं. त्यानंतर मोठी आतडी हळूहळू अन्न शोषून त्याला कठोर वेस्टमध्ये बदलते. ही पू्र्ण प्रक्रिया कंट्रोल करण्यात एंटेरिक नर्व्हस सिस्टीम म्हणजे आतडींची नर्व्हस सिस्टीम महत्वाची भूमिका निभावते. ज्याला अनेकदा गट ब्रेन असंही म्हटलं जातं. त्याशिवाय डायजेशन सिस्टीमच्या चिकट स्नायू, गॅस्ट्रिन आणि कोलेसिस्टोकिनिनसारखे हार्मोन सुद्धा ही प्रक्रिया सक्रिय करतात.
टॉयलेटला जाण्याची जास्त इच्छा कधी होते?
काही लोकांमध्ये जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जाण्याची इच्छा जास्त सक्रिय होते. अनेकदा काही खासप्रकारचे पदार्थ, औषधं, इन्फेक्शन किंवा मानसिक तणावही याला कारणीभूत असतात. जास्त कॅलरी असलेलं जेवण, तळलेले - भाजलेले पदार्थ, दारू आणि कॅफीनसारख्या पेयांमुळेही आतड्यांची हालचाल वेगाने होते. जर ही समस्या जास्त काळ सुरू राहिली तर ही डायजेशनसंबंधी आजारांशी निगडीत असू शकते. ज्यात इरिटेबल बाउल सिंड्रोम, डंपिंग सिंड्रोम, गॅस्ट्रोपेरेसिस आणि इंफ्लेमेटरी बाउल डिजीज यांसारख्या स्थितींचा समावेश असतो.
काय करावे उपाय?
जर ही समस्या कधी कधीच होत असेल तर खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल केला तर मदत मिळू शकते. फार जास्त मसालेदार, तेलकट किंवा कॅफीनयुक्त पदार्थ खाणं टाळले तर फायदा मिळू शकतो. पण जर पुन्हा पुन्हा जुलाब, पोटात मुरडा येत असेल किंवा वजन कमी झाल्याची लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
