Join us

दुपारच्या जेवणानंतर येणारा आळस अन् झोप होईल गायब, करा डॉक्टरांनी सांगितलेली ही ट्रिक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:58 IST

Sleep After Lunch: दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर डोळे टिकवून ठेवणं किंवा कामावर फोकस करणं अवघड होऊन बसतं. बरेच लोक तर बसल्या बसल्या डुलकी मारू लागतात.

Sleep After Lunch: दुपारच्या जेवणानंतर सामान्यपणे अनेकांना झोप येते. पोटभर जेवण झाल्या झाल्या डोळे जड होऊ लागतात आणि गुंगी येते. उन्हाळ्यात तर असं अधिकच होतं. घरी असलेल्या लोकांचं ठीक आहे ते झोप घेऊनही शकतात. पण ऑफिसमधील लोकांची समस्या होते. दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर डोळे टिकवून ठेवणं किंवा कामावर फोकस करणं अवघड होऊन बसतं. बरेच लोक तर बसल्या बसल्या डुलकी मारू लागतात. जर तुमच्यासोबतच असं होत असेल तर ही समस्या कशी दूर करावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक्सपर्टचा खास सल्ला...

दुपारच्या जेवणानंतर येणारी झोप पळवण्यासाठी काय करावं याबाबत न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओत माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, 'दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या झोपेला Post-Lunch Dip असं म्हटलं जातं. असं जास्त जड जेवण केल्यानं होतं'.

न्यूट्रिशनिस्टनुसार, 'अनेकदा लोक दुपारच्या जेवणात भात, तेलकट भाज्या किंवा काही गोड खातात. हे सगळं खाल्ल्यानं आपला ब्लड फ्लो पचनासाठी पोटाकडे शिफ्ट होतो आणि मेंदुला ऑक्सीजन कमी मिळू लागतं. तसेच या स्थितीत इन्सुलिन वाढतं, ज्यामुळे मेलाटोनिन आणि सेराटोनिन नावाचे नॅचरल स्लीप हार्मोन्स अॅक्टिव होतात. स्लीप हार्मोन अॅक्टिव झाल्यानं तुम्हाला झोप येऊ लागते'.

कशी पळवाल झोप?

डॉक्टरांनी सांगितलं की, 'जेवणानंतर येणारा आळस आणि झोपेला सहजपणे कंट्रोल करत येऊ शकतं. यासाठी तुम्हाला तुमच्या दुपारच्या जेवणात थोडासा बदल करावा लागेल. दुपारच्या जेवणात प्रोटीन आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करावा'.

न्यूट्रिशनिस्टनुसार, तुम्ही दुपारच्या जेवणात ग्रिल पनीर, सलाद, ब्राउन राइस खाऊ शकता. तसेच दुपाच्या जेवणानंतर ५ ते १० मिनिटं आवर्जुन वॉक करा. असं केल्यानं शरीराला लगेच एनर्जी मिळेल आणि तुम्ही तुमचं काम अधिक वेगानं करू शकाल. ही एक छोटीशी ट्र्रिक तुमची दुपारची झोप उडवण्यात मदत करू शकते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स