Join us

लठ्ठ नसतानाही पायऱ्या चढताना धाप लागते, श्वास फुलतो? वाचा तब्येतीची गडबड नेमकी काय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 20:17 IST

Health Tips : ही समस्या केवळ लठ्ठ लोकांनाच नाही तर सडपातळ लोकांना सुद्धा होते. त्यांना थोड्या पायऱ्या चढल्यावरही थकवा जाणवतो. अशात याचं कारण केवळ शरीरात वाढलेली चरबी नाही तर इतरही काही गोष्टी आहेत. 

Health Tips : पायऱ्या चढणं हा एक खूप चांगला व्यायाम मानला जातो. लिफ्टऐवजी पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेलात तर हृदयरोगाचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर पायऱ्या चढल्यानं वजन कमी करण्यास आणि फिट राहण्यास मदत मिळते. पण बऱ्याच लोकांना केवळ एक माळा चढून गेल्यावरही दम लागतो. त्यांचा श्वास भरून येतो. 

ही समस्या केवळ लठ्ठ लोकांनाच नाही तर सडपातळ लोकांना सुद्धा होते. त्यांना थोड्या पायऱ्या चढल्यावरही थकवा जाणवतो. अशात याचं कारण केवळ शरीरात वाढलेली चरबी नाही तर इतरही काही गोष्टी आहेत. 

न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर (Dt. Ramita Kaur) यांनी पायऱ्या चढताना येणाऱ्या थकव्याची काही लक्षणं सांगितली आहेत. त्या सांगतात की, पायऱ्या चढताना श्वास भरून येणं हे काही केवळ तुमच्या वजनामुळे होतं असं नाही तर शरीरात असलेल्या इतर समस्येमुळेही होऊ शकतं. अशात पायऱ्या चढताना श्वास भरून येणे किंवा थकवा जाणवणे याची कारणं जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही या समस्येवर योग्य ते उपाय करू शकाल.

पायऱ्या चढताना श्वास का भरून येतो?

जर पायऱ्या चढताना तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल किंवा श्वास भरून येत असेल तर याची 5 कारणं असू शकतात. जसे की, हीमोग्लोबिन कमी होणे किंवा शरीरात आयर्नची कमतरता होणे, फुप्फुसं कमजोर होणे, पोषक तत्वांची कमतरता, शरीरात विषारी तत्व असणे आणि हार्मोन्समध्ये संतुलन बिघडणे.

काय कराल उपाय?

या समस्यांमुळे तुम्ही पायऱ्या चढणं सोडू शकत नाहीत आणि तुमच्याकडे लिफ्टही नाही. अशात या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे. यासाठी न्यूट्रिशनिस्टनं काही उपाय सांगितले आहेत. 

आवळा आणि बीटाचा ज्यूस

तुम्ही जर दिवसाची सुरूवात बीट आणि आवळ्याच्या ज्यूसनं कराल तर तुम्हाला थकवा दूर करण्यास मदत मिळू शकते. या खास ज्यूसनं तुमचं हीमोग्लोबिन वाढतं. सोबतच या दोन्ही गोष्टींमध्ये व्हिटामिन सी भरपूर असतं, ज्यामुळे आयर्नचं अवशोषण चांगलं होतं.

ब्रीदिंग एक्सरसाईज

फुप्फुसं मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज ब्रीदिंग एक्सरसाईज करू शकता. रोज अनुलोम-विलोम आणि भ्रामरीचा 5 मिनिटं अभ्यास केला तर फुप्फुसांची क्षमता वाढते.

थकवा दूर करणारे सुपरफूड्स

थकवा आणि आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी रोज कढीपत्ता आणि भिजवलेले मनुके खायला हवेत. या गोष्टींनी तुम्हाला एनर्जी मिळेल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स