Why frequent thirst: तहान लागणं ही शरीराची एक नॅचरल प्रक्रिया आहे. जसं की आपल्याला माहीत आहेच की, पाणी शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. पण सतत तहान लागणं एका आजाराकडे इशारा करतं. बऱ्याचदा अशी काही लक्षणं असतात ज्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. हीच छोटी छोटी लक्षणं एखाद्या गंभीर आजाराकडे इशारा करतात. जेव्हा शरीर पुन्हा पुन्हा काही संकेत देत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज असते. कारण नंतर पश्चाताप होऊ शकतो. पुन्हा पुन्हा तहान लागणं किंवा घसा कोरडा होणं ही लक्षणं एका सायलेंट किलर आजाराकडे इशारा करतात.
पुन्हा पुन्हा तहान लागणं डायबिटीसचा संकेत
जेव्हा पुन्हा पुन्हा तहान लागते, तेव्हा जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, शरीरात पाणी कमी झाल्यामुळे असं होत असेल. पण असं काही गरजेचं नाही की, हे लक्षण केवळ पाणी कमी होण्याकडे इशारा करत असेल. पुन्हा पुन्हा तहान लागणं हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. चुकीची लाइफस्टाईल आणि अनहेल्दी खाण्यामुळे डायबिटीससारखा सायलेंट किलर आजार होऊ शकतो.
काय आहे कारण?
किडनीला जेव्हा शरीरातील अतिरिक्त शुगर फिल्टर करण्यासाठी जास्त काम करावं लागतं, तेव्हा पुन्हा पुन्हा लघवी लागते. जास्त वेळ लघवी केल्याने शरीरात डिहायड्रेशन होतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. तोंड किंवा घसा कोरडा पडतो, ही लक्षणं याच गंभीर आजाराकडे इशारा करतात. अशी काही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि शुगर लेव्हल चेक करा. जेणेकरून कळेल की आपल्याला डायबिटीस झालाय की नाही.
लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
पुन्हा पुन्हा तहान लागण्यासोबतच सतत भूक लागणं हा देखील डायबिटीसचा संकेत असू शकतो. डायबिटीस झाल्यावर अचानक वजन कमी होऊ शकतं. शरीरात ऊर्जा कमी झाली, सतत थकवा येत असेल आणि कमजोरी जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तसेच डायबिटीस झाल्यावर डोळ्यांनी धुसर दिसू शकतं. जेव्हा शरीरात एकत्र ही सगळी लक्षणं दिसत असतील तेव्हा डायबिटीस होण्याची शक्यता बरीच वाढते. त्यामुळे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण डायबिटीस हा असा आजार आहे ज्यावर ठोस असा काही उपाय नाही. हा आजार आयुष्यभर आपला पिच्छा पुरवतो.
