Join us

फॅटी लिव्हरचा धोका टाळा, नियमित खा ४ गोष्टी- दारु पिण्याइतकाच धोकादायक ठरतोय चुकीचा आहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:00 IST

Liver Detox: आजकालची बदलती लाइफस्टाईल ही अत्यंत धोकादायक ठरते आहे.

Liver Detox: लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतं. लिव्हरचं मुख्य काम बॉडी डिटॉक्स करणं म्हणजेच शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणं. अशात शरीरानं व्यवस्थित काम करावं यासाठी लिव्हरनं योग्यपणे काम करणं गरजेचं असतं. पण आजकालची बदलती लाइफस्टाई, अनहेल्दी फूड्स आणि कमी फिजिकल अ‍ॅक्टिविटीमुळे प्रत्येक दुसरी व्यक्ती फॅटी लिव्हरनं पीडित होत आहे. जर वेळीच लिव्हरची काळजी घेतली नाही तर याचा प्रभाव त्वचेवर, पचनावर आणि इम्यून सिस्टीमवर बघायला मिळतो. 

एक चांगली बाब म्हणजे ज्याप्रमाणे चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे लिव्हरवर दबाव वाढतो, त्याचप्रमाणे आहारात काही बदल करून लिव्हर डिटॉक्स करण्यासही मदत मिळते.

फेमस आयु्र्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या यूट्यू चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी ४ अशा फूड्सबाबत माहिती दिलीये, जे लिव्हर निरोगी ठेवतात आणि नॅचरली डिटॉक्स करण्याचं काम करतात. डॉक्टर रॉबिन सांगतात की, या ४ गोष्टींचा आहारात समावेश केला तर २० ते २५ दिवसात लिव्हर पूर्णपणे डिटॉक्स होण्यास मदत मिळू शकते.

हळद

डॉक्टर सांगतात की, हळदीमध्ये आढळणारं करक्यूमिन तत्व एक प्रभावी अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व आहे. जे लिव्हरवरील सूज कमी करण्यास आणि ऑक्सीडेटिव डॅमेजपासून बचावास मदत करतं. रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात चिमुटभर हळद टाका, थोडं तूप टाका आणि कॉफी टाकून प्या. यानं लिव्हरची कार्यक्षमता वाढते. तसेच फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस या समस्यांचा धोकाही कमी होतो.

लसूण

आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, लसणामध्ये एलिसिन नावाचं एक तत्व असतं, जे लिव्हर डिटॉक्सशी संबंधित एंझाइम्स सक्रिय करतं. ज्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. यानं लिव्हर तर साफ होतंच, सोबतच इम्यूनिटीही वाढते. रोज सकाळी एक ते दोन लसणाच्या कच्च्या कळ्या खाऊन वरून एक ग्लास पाणी पिऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, चवळ अशा वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्यांम्ये क्लोरोफिल नावाचं एक नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. जे फ्री रॅडिकल्ससोबत लढून लिव्हरला हेल्दी ठेवतं. तसेच या भाज्यांमुळे पचन तंत्र देखील मजबूत होतं. अशात डॉक्टर आठवड्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. 

लिंबाचा रस

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असतं, जे लिव्हरसाठी एका अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. लिंबामुळे शरीरातून विषारी तत्व बाहेर पडण्याची प्रक्रिया अधिक वेगानं होते. यासाठी डॉक्टर सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचा सल्ला देतात.

डॉक्टर रॉबिन शर्मा यांच्यानुसार, लिव्हर नियमितपणे आतून साफ केल्यास फॅटी लिव्हरची समस्या टाळता येऊ शकते. सोबतच एकंदर आरोग्यालाही याचा फायदा मिळतो. या चारही नॅचरल गोष्टी सुरक्षित आहेत आणि प्रभावी आहेत. या गोष्टींची डेली डाएटमध्ये समावेश कराल तर फायदाच मिळू शकेल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स