Join us   

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं? १५ दिवसांत वजन वाढेल, हा घ्या साधा-सोपा आहार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 4:09 PM

Experts Share Morning To Night Diet Plan For Gain : हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी आणि मांसपेशी मजबूत बनवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. 

वजन कसं वाढवतात, वजन वाढवण्यासाठी काय खायचं, वजन वाढवण्यासाठी डाएट चार्ट, काय खायचं काय नाही असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. (Health Tips) वजन वाढणं ही एक गंभीर समस्या आहे. कमी असलेलं वजन वाढवण्यासाठी लोक मास गेनर किंवा प्रोटीन पावडरचे डब्बे खाणं सुरू करतात.  फिटनेस ट्रेनर सोनी यांच्यामते प्रोटीन पावडरने अंग फुलू लागते. (Famous Fitness Experts Share Morning To Night Diet Plan For Gain 4 Kg Weight In 15 Days)

मेडीकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार वजन वाढवण्यासाठी आहारात कार्बोहायडेट्स, भात, गव्हाचा ब्रेड, डार्क चॉकलेट, प्रोटीन शेक, प्रोटीन सप्लिमेंट्स, बटाटा, व्हाईट ब्रेड, दूध ड्राय फ्रुट्सचा आहारात समावेश करा. ज्यामुळे एनर्जी  मिळते आणि लवकर भूकही  लागत  नाही.

वजन वाढवण्याची सोपी पद्धत कोणती?

फिटनेस ट्रेनर नितेश सांगतात की  १५ दिवसांत ४ किलो वजन वाढवायचं असेल तर तुम्ही वेट गेनर डाएट चार्ट फॉलो करायला हवं. हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी आणि मांसपेशी मजबूत बनवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. 

वजन वाढवण्यासाठी नाश्त्याला काय खायचं?

१०० ग्राम दलिया, ५० ग्राम शेंगदाणे, ५ ग्राम  गुळ, १ केळी खाऊ शकता. 

नाश्त्याच्या दोन तासानंतर हे पदार्थ खा

५० ग्राम सोया चंक्स

२०० ग्राम दही आणि कच्चा भाज्या 

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

वजन वाढवण्यासाठी लंचमध्ये काय खायचं?

भाताबरोबर राजमा डाळ, एक ग्लास ताक, एक चमचा साजूक तूप किंवा सॅलेड खाऊ शकता.

प्री वर्कआऊट मीलमध्ये काय खायचं?

वर्कआऊटच्या कमीत कमी ९० मिनिटं आधी २०० ग्राम बटाटे किंवा रताळे खा, त्यावर काळं मीठ घालायला विसरू नका. सातूचा शेक घ्या, यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करा. ५० ग्राम भाजलेले चणे, २०० ग्राम लो फॅट मिल्क, २ खजूर, १ केळी, ५ ग्राम गुळ घ्या. 

जेवताना रोज 1 चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत

वजन वाढवण्यासाठी रात्रीच्या जेवणात काय खायचे?

150 ग्रॅम पनीरची बुर्जी घ्या, २ चपाती खा, सॅलेड खा, १ चमचा साजूक तूप घ्या.  हे डाएट सतत १५ दिवस फॉलो केल्याने वजन वाढेल आणि तब्येतही चांगली राहील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल