Join us

दातांना आतून खड्डे पडलेत-कीड लागली? डॉक्टर सांगतात १ खास उपाय, दातदुखी होते कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:57 IST

5 Effective Tips To Get Rid Of Cavity At Home : कॅव्हिटीज रोखण्यासाठी आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी टुथपेस्ट आणि माऊथवॉशचा वापर खूप गरजेचा आहे.

नेहमी गोड खाल्ल्यामुळे, चहा-कॉफीचे अतिसेवन यामुळे दात जास्त प्रमाणात किडू लागतात. दातांमध्ये कॅव्हिटी झाल्यास बॅक्टेरिया दातांच्या नसांपर्यंत पोहोचून पू तयार होतो किंवा इन्फेक्शन होऊ शकते. जबड्याच्या खालच्या बाजूचे दात जास्त प्रमाणात किडतात. अनेकदा दातांच्या मध्यभागी खड्डा सुद्धा तयार होतो. ज्याला कॅव्हिटीज असं म्हणतात (How To Get Rid Of Cavity). दातांमध्ये अन्नकण अडकून राहतात ते बराच काळ तसेच राहिल्यानं दातांना किड लागते. तोंडात वाढणारे बॅक्टेरिया व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे प्लाक आणि टार्टर तयार होते ज्यामुळे कॅव्हिटीज होतात. किडलेले दात पुन्हा चांगले होण्यासाठी हजारो रूपये खर्च करावे लागतात. दात किडू नयेत यासाठी डॉक्टरांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. (5 Effective Tips To Get Rid Of Cavity At Home)

जास्त प्रमाणात पाणी प्या

प्रसिद्ध डॉक्टर इले फिलिप्स यांनी काही सोपे उपाय सांगितले आहे. या उपायांचा अवलंब करून तुम्ही दात किडण्याची समस्या टाळू शकता. आपली लाळ दातांसाठी नॅच्युरल प्रोटेक्शन आहे. जी दातांच्या कमकुवत भागांना पुन्हा मजबूत करत. ज्यामुळे दात सुरक्षित राहतात (Ref). जास्तवेळ तोंड कोरडं पडल्यामुळे कॅव्हिटीज जास्त वाढतात. ज्यामुळे पाणी अधिक प्यावं लागतं आणि तोंड कोरडं पडतं.

जायलीटॉल च्युईंगम

तुमचं तोंड कोरडं पडत असेल तर जायलीटॉल शुगर फ्री च्युईंग गम फायदेशीर ठरतं. ही एक नॅच्युरल शुगर आहे जे बॅक्टेरियाज पचवू शकत नाही. याव्यतिरिक्त च्युईंग चावल्यानं लाळेचा स्त्राव वाढतो. दात धुवून स्वच्छ होतात आणि त्यात नवीन मिनरल्स जमा होतात.

चांगली टुथपेस्ट निवडा

कॅव्हिटीज रोखण्यासाठी आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी टुथपेस्ट आणि माऊथवॉशचा वापर खूप गरजेचा आहे. अशा माऊथ वॉशची निवड करा ज्यात सोडियम फ्लोराईड असेल. फ्लोराईडचा माऊथ वॉश दातांच्या इनॅमेलवर चांगला परीणाम करतो. दिवसातून २ वेळा याचा वापर केल्यास कॅव्हिटीज टाळता येतात.

आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

खाण्यापिण्याची वेळ योग्य ठेवा

कॅव्हिटीज फक्त गोड खाल्ल्यानं होत नाहीत तर सतत खाल्ल्यामुळे पण होते. जर तुम्ही सतत काही ना काही खात असाल तर दातांवर एसिड अटॅक होतो. ज्यामुळे दातांना दुरूस्त होण्यासाठी वेळ मिळत नाही. यासाठी खाण्यापिण्यात २ ते ३ तासांचं अंतर असायलाच हवं.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल