त्वचेशी संबंधित समस्या आजकाल खूप सामान्य आहेत. जगभरात आणखी एक समस्या सामान्य होत आहे ती म्हणजे मुलींना दाढी किंवा मिशा येत आहेत, ज्याला चेहऱ्यावरील केस म्हणतात. अनेक मुली यासाठी उपचार घेत आहेत. हे बहुतेकदा हार्मोनल असंतुलनामुळे होतं. मात्र हे एकमेव कारण नाही. बदलती लाईफस्टाइल आणि फास्ट फूडच्या अधिक सेवनाने देखील होत आहे.
रशियन वेबसाईट इझवेस्टियानुसार, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि मिठाईंसारख्या फास्ट फूडमध्ये साखर, मीठ आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, जे इन्सुलिन रसिस्टेंस वाढवतं. हे इन्सुलिन शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडवतं आणि महिलांमध्ये पुरुष हार्मोनची पातळी वाढवतं. यामुळे मुलींमध्ये चेहऱ्यावरील केसांची वाढ होते. हे फास्ट फूड थेट केसांच्या वाढीस कारणीभूत ठरत नाहीत, तर वजन वाढण्यास आणि हार्मोनल असंतुलनाला चालना देतात, ज्यामुळे केसांची वाढ होते. हे केस चेहऱ्यावर, हनुवटीवर किंवा भुवयांभोवती वाढतात, ज्याला मेडिकल भाषेत हिर्सुटिज्म (Hirsutism) म्हणतात.
कधी वाढते ही समस्या?
रिपोर्टनुसार, मासिक पाळी सुरू झाल्यावर मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. या काळात फास्ट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने केसांची वाढ होण्याचा धोका वाढू शकतो. लठ्ठपणा, इन्सुलिन रसिस्टेंस आणि अनियमित खाण्याच्या सवयी देखील हर्सुटिझमला कारणीभूत ठरू शकतात.
जेव्हा मुलींना या नको असलेल्या केसांबद्दल काळजी वाटते तेव्हा त्या काढून टाकण्यासाठी अनेकदा दाढी करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय घरगुती उपायांचा वापर न करण्याचा सल्ला देतात.
हे देखील असू शकतं कारण
रिप्रोडक्टिव हेल्थच्या WHO एक्सपर्ट, सिनर्जी यूनिव्हर्सिटीच्या मेडिकल डिपार्टमेंटमधील सीनिअर लेक्चरर आणि स्त्री रोग विशेषज्ञ ल्यूबोव येरोफेयेवा (Lyubov Yerofeyeva) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा मुलींचं वजन वाढतं तेव्हा त्यांच्या इस्ट्रोजेनची हार्मोन अनेकदा वाढते. कधीकधी, महिलांमध्ये हायपोथॅलेमिक-पिट्यूटरी-अॅड्रेनल सिस्टमच्या बिघाडामुळे फ्री टेस्टोस्टेरोनची पातळी देखील वाढते. सेक्सुअल डिजाइयर, सामान्य केसांची वाढ आणि इतर प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी फ्री टेस्टोस्टेरोन सहसा आवश्यक असते. या वाढीमुळे केसांची वाढ होते.
उपाय आणि उपचार
हा समस्या हार्मोनल असंतुलनाचे निदान करून आणि योग्य उपचार घेऊन कमी करता येतात. डाएट आणि लाईफस्टाइलमधील बदल हे देखील प्राथमिक उपचार आहेत. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, वजन नियंत्रण आणि निरोगी लाईफस्टाइल वापरून ही प्रक्रिया सहजपणे सुधारता येते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेझर उपचार देखील वापरता येतात, परंतु कोणताही घरगुती उपाय करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
