Healthy Tips: रोज सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक महत्वाची क्रिया असते. सामान्यपणे कुणीही टॉयलेटला गेल्यावर त्यांना पोट साफ होण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. पण काही लोक असेही असतात ज्यांना पोट साफ होण्यासाठी टॉयलेटमध्ये 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागतो. जास्तीत जास्त लोकांचा असा समज असतो की, ते जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहिले तर पोट जास्त साफ होईल. पण हा त्यांचा मोठा गैरसमज असतो. कारण डॉक्टर सांगतात की, टॉयलेटमध्ये 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहत असाल तर हा पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा संकेत असू शकतो किंवा अनेक आजारांचा धोका वाढतो. न्यूट्रिशनिस्ट सोनिया नारंग यांनी सांगितलं की, फोन घेऊन टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यानं आरोग्यासंबंधी कोणकोणत्या समस्यांचा धोका वाढतो.
टॉयलेटमध्ये 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसण्याचे नुकसान
पाइल्स
न्यूट्रिशनिस्ट सोनिया नारंग यांनी सांगितलं की, बाथरूममध्ये जर संडासासाठी जास्त वेळ बसावं लागत असेल तर यामुळे पाइल्स होण्याचा धोका वाढतो. कारण रेक्टमचा नसा आणि गुद्वारावर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे त्या जागेवर सूज आणि इन्फ्लामेशन होतं. इतकंच नाही तर यामुळे पेल्विक एरिया म्हणजे ओटीपोटातील ब्लड सर्कुलेशनही स्लो होतं. ज्यामुळे नसांमध्ये हेमोरॉइड्स तयार होऊ लागतात.
बद्धकोष्ठता
आजकाल अनेकजण बद्धकोष्ठतेच्या समस्येने हैराण आहेत. तुम्हालाही आधीच ही समस्या असेल तर टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहिल्यानं ही समस्या आणखी वाढू शकते. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे शरीराला नॅचरली माहीत असतं की, त्याला पोट कधी साफ करायचं आहे. जेव्हा ही इच्छा कमी होते तेव्हा विष्ठा आणखी कठोर कडक होते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. ज्यामुळे जास्त जोर लावावा लागतो आणि यानं आतड्यांवर अधिक दबाव पडतो.
यूरिनरी लीकेज
पेल्विक फ्लोर म्हणजे ओटीपोटाच्या मसल्स वॉशरूममध्ये जास्त वेळ बसलण्यानं कमजोर होऊ लागतात. ज्यामुळे ओटीपोटावर अधिक दबाव पडतो, अशात यूरेथरामध्ये जास्त लघवी जमा होते. याच कारणानं व्यक्ती उभी झाल्यावर लघवी थोडी थोडी बाहेर निघते. यानं ब्लॅडरच्या लघवी रोखण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पडतो.
बॅक्टेरिया
बऱ्याच लोकांना सवय लागली आहे की, ते वॉशरूमला जाताना फोन सोबत घेऊन जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वॉशरूममधील डोळ्यांनी न दिसणारे बॅक्टेरिया फोनवर चिकटतात. फ्लश केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनला हात लावत असाल तर शेकडो बॅक्टेरिया फोनवर लागतात आणि यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनचा धोका वाढतो.