Sitting on the Toilet Too Long Can Be Harmful: आपल्या घरात किंवा आजूबाजूला असे बरेच लोक आपण पाहिले असतील जे टॉयलेटमध्ये बराच वेळ घालवतात. टॉयलेट सीटवर बसून २५ ते ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोन बघणं अनेकांची सवय झाली आहे. पण हे सामान्य वाटत असलं तरी सामान्य नसून आरोग्यासाठी फारच घातक ठरू शकते. टॉयलेटमध्ये जास्त बसल्याने काय होऊ शकतं आणि किती वेळ बसावं याबाबत डायटिशिअन श्रेया गोयल यांनी इन्स्टाग्राम एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. चला पाहुयात काय आहे त्यांचा सल्ला...
टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसणं का धोक्याचं?
डायटिशिअन सांगतात की, एक हेल्दी बॉवेल मुव्हमेंट म्हणजेच पोट साफ होण्याची क्रिया काही मिनिटांमध्येच व्हायला हवी. नॉर्मली पोट साफ होण्यासाठी ५ ते १० मिनिटांची वेळ पुरेशी आहे. १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसणं धोक्याचं मानलं जातं. जर आपण फार जास्त बसून राहत असाल किंवा जास्त जोर लावत असाल, तर यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. जास्त टॉयलेटमध्ये बसून राहिल्याने रेक्टल एरिया म्हणजेच गुदभागावर दबाव पडतो. ज्यामुळे पाइल्सची समस्या होण्याचा धोका असतो.
बरेच लोक सगळ्यात मोठी चूक ही करतात की, ते टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात. फोन स्क्रोल करत आपण जास्त वेळ बसतो, पण पोट साफ होण्यावर फोकस करत नाही. अशात जास्त वेळ बसून राहिल्याने रेक्टल मसल्स कमजोर होऊ लागतात आणि वेदना होऊ लागतात.
स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं आणि बराच वेळ बघत बसणं खूप घातक असतं. बाथरूममधील बॅक्टेरिया आणि कीटाणू फोनवर बसतात. नंतर तेच फोनद्वारे आपल्या बेडवर, डायनिंग टेबलवर आणि हातांवर पोहोचतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.
त्यामुळे हेच योग्य राहील की, टॉयलेटमध्ये फोन अजिबात घेऊन जाऊ नये. फोनचा वापर फक्त कामापुरता करा. जास्त स्क्रीन बघू नका आणि शरीराच्या नॅचरल सिग्नलवर लक्ष द्या. जर पुन्हा पुन्हा बद्धकोष्ठता किंवा टॉयलेटमध्ये समस्या होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Web Summary : Spending too much time on the toilet, often with a phone, is harmful. Dietitian Shreya Goel advises limiting toilet time to 10-15 minutes to avoid constipation and piles. Phones spread bacteria and weaken rectal muscles. Listen to your body; consult a doctor for persistent issues.
Web Summary : शौचालय में अधिक समय बिताना हानिकारक है, खासकर फोन के साथ। डायटीशियन श्रेया गोयल कब्ज और बवासीर से बचने के लिए 10-15 मिनट तक का समय सीमित रखने की सलाह देती हैं। फोन बैक्टीरिया फैलाते हैं और मलाशय की मांसपेशियों को कमजोर करते हैं। शरीर की सुनें और लगातार समस्या होने पर डॉक्टर से सलाह लें।