Join us

काहीही खाल्ल्यावर पोट फुगतं, अस्वस्थ वाटतं? तज्ज्ञ सांगतात ‘हा’ उपाय, वाटेल लवकर बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:27 IST

न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत.

Bloating Home Remedies : बऱ्याच लोकांना जेवण केल्या केल्या किंवा काहीही खाल्ल्यानंतर ब्लोटिंगची म्हणजेच पोट फुगण्याची समस्या होत असते. पोट फुगण्याची समस्या फारच त्रासदायक आणि अस्वस्थ करणारी असते. काही खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची समस्या होण्याची कारणं वेगवेगळी असतात. यात खाल्लेलं व्यवस्थित पचन न होणे, घाईघाईनं खाणे, तेलकट जास्त खाणे, मसालेदार जास्त खाणे या गोष्टींचा समावेश करता येईल. अशात ही पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...

ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे उपाय

बडीशेप

बडीशेपमध्ये अ‍ॅंटी-पास्मोडिक गुण असतात. जे डायजेस्टिव सिस्टीममध्ये अडथळा ठरणाऱ्या गोष्टी दूर करतात. बेडीशेपनं गॅसची समस्या दूर होते, पोट फुगत नाही आणि पोटाचं दुखणंही दूर होतं. या समस्या दूर करायच्या असेल तर जेवण केल्यावर 15 मिनिटांनंतर एक छोटा चमचा बडीशेपचे दाणे खावेत. पोट फुगण्याची समस्या कधीही झाली की, तुम्ही बडीशेप खाऊ शकता. बडीशेपचे दाणे बारीक चावून खाल तर जास्त फायदा मिळेल. यात असे काही तत्व असतात जे इन्फ्लेमेशन, गॅस आणि ब्लोटिंगचं कारण बनवणाऱ्या बॅक्टेरियाना नष्ट करतात. तुम्ही बडीशेप अशीही खाऊ शकता किंवा बडीशेपचं पाणीही पिऊ शकता. 

इतरही काही उपाय

लिंबाचा रस

लिंबू नॅचरल डाउयुरेटिक्स आणि जेंटल लॅक्सेटिव्ससारखं काम करतं यामुळे लिंबाचा रस पाण्यात टाकून प्यायल्याने फ्लूइड इंटेक वाढतं. याने तुमची पोट फुगण्याची, गॅसची आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या अनेकदा बद्धकोष्ठता किंवा गॅसमुळेही होते.

अननस

अननसामध्ये डायजेस्टिव एंझाइम ब्रोमलेन असतं जे ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अननसाचा मधला भाग बारीक करून याचा रस प्या करावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स