Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झरझर वाढणारे बीपी राहिल नियंत्रणात! आठवड्याभरात 'इतके' मिनिटे करा व्यायाम, झोपही लागेल शांत

झरझर वाढणारे बीपी राहिल नियंत्रणात! आठवड्याभरात 'इतके' मिनिटे करा व्यायाम, झोपही लागेल शांत

best exercises for hypertension: lower blood pressure with workout: manage BP and improve sleep: आठवड्याभरात किती तास व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात होईल पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2025 11:30 IST2025-07-06T11:29:09+5:302025-07-06T11:30:03+5:30

best exercises for hypertension: lower blood pressure with workout: manage BP and improve sleep: आठवड्याभरात किती तास व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात होईल पाहूया.

exercise to control blood pressure weekly workout for high BP how to reduce hypertension naturally | झरझर वाढणारे बीपी राहिल नियंत्रणात! आठवड्याभरात 'इतके' मिनिटे करा व्यायाम, झोपही लागेल शांत

झरझर वाढणारे बीपी राहिल नियंत्रणात! आठवड्याभरात 'इतके' मिनिटे करा व्यायाम, झोपही लागेल शांत

धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामाचा वाढता ताण, झोपेची कमतरता आणि बाहेरच्या जंकफूडमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.(Bp Problem) इतकेच नाही तर आपण वारंवार चहा आणि कॅफीन प्यायल्याने आपले आरोग्य धोक्यात येते.(best exercises for hypertension) पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी न केल्याने आपल्या शरीरासह मनावर अधिक ताण येतो.(blood pressure control tips) तज्ज्ञ म्हणतात पुरेशी झोप न घेतल्याने रक्तदाब वाढतो. आणि हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. (natural remedies for high BP)
उच्च रक्तदाब वाढल्यावर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो.(calm mind and healthy heart) ज्यामुळे म्हातारपणी डिमेंशियाचा धोका देखील वाढतो. WHO च्या मते पाच महिलांपैकी जवळजवळ एका महिलेला उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.(lifestyle tips for BP management) रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला पुरेसा आहार आणि योग्य व्यायाम करायला हवा. तसेच दैनंदिन दिनचर्येत काही सवयींचा अवलंब करावा. ज्यामुळे या आजारापासून आपले संरक्षण होईल.(best exercises for hypertension) आठवड्याभरात किती तास व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात होईल पाहूया. 

मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? ५ गोष्टी करा, मुलं रोज आनंदानं जातील शाळेत-छान रमतील

वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाबाचा धोका कमी करायचा असेल तर आपल्याला काही सवयींमध्ये बदल करायला हवा. निरोगी खाण्यासोबतच आपल्याला नियमितपणे व्यायाम करायला हवा. यामुळे इतर आजारांचा धोका कमी होईल. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या काळात आठवड्यातून किमान पाच तास हलका व्यायाम केला तर उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. 

आठवड्यातून सुमारे ५ तास व्यायाम, ज्यामध्ये आपण काही एरोबिक प्रकारांचा समावेश करु शकतो. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहिल. व्यायाम केल्यामुळे आपले हृदय मजबूत होते. ज्यामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो. रक्तवाहिन्यांना पुरेशा प्रमाणात रक्त मिळाले नाही की, रक्तदाब कमी जास्त होतो. नियमित व्यायाम देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब वाढतो. त्यासाठी वजन देखील नियंत्रणात असणे गरजेचे आहे. 

Web Title: exercise to control blood pressure weekly workout for high BP how to reduce hypertension naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.