आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईलवर जास्त वेळ घालवू लागली आहेत, त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. इतकंच नाही तर स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, आळस आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढत आहे
दीर्घकाळ सुरू असलेल्या या प्रकारच्या जीवनशैलीचा मुलांच्या हृदयाच्या आरोग्यावर अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत, मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करणं आणि त्यांना इतर मजेदार गोष्टी करायला लावणं खूप महत्त्वाचं झालं आहे, जेणेकरून ते नेहमी तंदुरुस्त, एक्टिव्ह राहतील आणि त्यांचं हृदय देखील निरोगी राहतील
मुलांचा स्क्रीन टाइम कसा करायचा कमी?
फॅमिली डान्स पार्टी
मुलांच्या आवडत्या गाण्यांवर दर आठवड्याला डान्स पार्टी आयोजित करा. यामुळे मुलं एक्टिव्ह राहतात आणि हृदयाचं आरोग्यही सुधारतं.
वीकली आउटडोअर गेम
तुमच्या घराभोवती किंवा बागेत विविध प्रकारचे गेम खेळा. हा हृदयासाठी हा एक उत्तम व्यायाम असेल.
स्केटिंग
मुलांसोबत स्केटिंगला जा. यामुळे ते फ्रेश राहतील.
बॅडमिंटन आणि मैदानी खेळ
क्रिकेट, बॅडमिंटन या सारख्या मैदानी खेळांमध्ये मुलांना सामील करा. या खेळांमुळे मुले शारीरिकदृष्ट्या एक्टिव्ह राहतील.
बागकाम
मुलांना बागकामात सहभागी करून घ्या, जसं की झाडांना पाणी देणं. यामुळे त्यांचा व्यायाम होईल, जो हृदयासाठीही फायदेशीर ठरेल.
मिनी स्पोर्ट्स टूर्नामेंट
दर महिन्याला घरी एक मिनी स्पोर्ट्स टूर्नामेंट आयोजित करा, ज्यामध्ये मुलं स्पर्धात्मक खेळ जसं की, टेबल टेनिस, फुटबॉल किंवा बॅडमिंटन खेळू शकतात.
फास्ट फूड देऊ नका
फास्ट फूड, तळलेले आणि बेक केलेले पदार्थ कमी करा. हे खाताना मुले अनेकदा फोनचा वापर करतात. त्याऐवजी फळं, ताज्या हिरव्या भाज्या, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा आहारात समावेश करा.