महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बहुसंख्य महिला अशा असतात ज्यांचं स्वत:च्या आरोग्याकडे, खाण्याकडे, आरामाकडे, व्यायामाकडे लक्षच नसतं. नवरा, मुलं, कुटूंब यांच्याभोवती त्यांचं आयुष्य फिरत राहातं. त्यामुळे मग कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी डोकं वर काढायला लागतात. आता तर अगदी पस्तिशीतल्या महिलांचेही हाडं ठणकतात, बसता- उठता कंबर, गुडघे कुरकुरतात. पीसीओडी, पीसीओएस यासारख्या समस्या तर आहेतच. शिवाय त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, कमी वयात पांढरे होणे असे त्रासही रोजच होतात. रोजच्या कामानेच खूप थकवा व्हायला लागतो. ऐन पस्तिशीच या समस्या काही बऱ्या नाहीत. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलेले पुढचे काही साधे सोपे उपाय नक्कीच करून पाहा..(supplement's necessary for each and every woman)
महिलांनी कोणत्या सप्लिमेंट्स घ्यायला हव्या?
काही सप्लिमेंट्स असे असतात जे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवे. पण अशाही काही सप्लिमेंट्स असतात ज्या साधारण तिशी- पस्तिशीनंतरची कोणतीही निरोगी व्यक्ती घेऊ शकते. या सप्लिमेंट्स कोणत्या आणि त्याने काय फायदे होतात याविषयीचा व्हिडिओ डॉक्टरांनी drnoorieblogs या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो
यामध्ये त्या म्हणतात की ओमेगा ३ आणि फायबर या दोन सप्लिमेंट्स प्रत्येक स्त्रीने घेणं खूप गरजेचं आहे. कारण ओमेगा ३ शरीरात पुरेशा प्रमाणात असेल तर हार्मोन्सचे संतुलन राहाते. त्यामुळे मग पीसीओएस, पीसीओडी, थायरॉईड यासारखे कित्येक त्रास कमी होतात. अगदी ताण कमी होऊन शांत झोप येण्यासही मदत होते. याशिवाय शरीरावरची सूज कमी करण्यासाठी, त्वचा आणि केस यांचं आरोग्य सुधारण्यासाठीही ओमेगा ३ उपयुक्त ठरतं. मासिक पाळीच्या कित्येक तक्रारीही कमी होतात.
दुसरं आहे फायबर सप्लिमेंट्स. या सप्लिमेंट्स नियमितपणे घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते. पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारल्याने आरोग्याला कित्येक फायदे होतात.
उन्हाळा स्पेशल: फक्त २ मिनिटांत गारेगार गुलकंद शेक तयार, मुलंही करतील एवढी सोपी रेसिपी...
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच शरीरातली इस्ट्रोजीनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही फायबर सप्लिमेंट्स मदत करतात. आहारातून हे दोन्ही घटक पुरेशा प्रमाणात मिळतीलच असं नाही. म्हणूनच या दोन सप्लिमेंट्स सुरू करा असं डॉक्टर सांगतात.
Web Summary : Women often neglect their health, leading to issues like fatigue, skin problems, and hair loss. Doctors recommend Omega-3 and fiber supplements to balance hormones, improve skin and hair health, regulate blood sugar, and aid weight management. These supplements address common deficiencies and promote overall well-being.
Web Summary : महिलाएं अक्सर अपने स्वास्थ्य की उपेक्षा करती हैं, जिससे थकान, त्वचा की समस्याएं और बालों का झड़ना जैसी समस्याएं होती हैं। डॉक्टर हार्मोन को संतुलित करने, त्वचा और बालों के स्वास्थ्य में सुधार करने, रक्त शर्करा को नियंत्रित करने और वजन प्रबंधन में सहायता के लिए ओमेगा-3 और फाइबर सप्लीमेंट की सलाह देते हैं। ये सप्लीमेंट आम कमियों को दूर करते हैं और संपूर्ण कल्याण को बढ़ावा देते हैं।