एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला इन्स्ंटट एनर्जी मिळते. पण यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण होतो. एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने मेंदूच्या वाढीवरही वाईट परिणाम होतो. आजकाल विविध प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. हे एनर्जी ड्रिंक्स शरीराला त्वरित एक्टिव्ह मोडमध्ये आणू शकतात. पण दीर्घकाळात ते शरीराला हानी पोहोचवतात.
जास्त साखर आणि जास्त कॅफीन असलेली हे एनर्जी ड्रिंक्स गेल्या काही वर्षांत मधुमेहाचं प्रमुख कारण बनले आहेत. अलीकडेच कंबोडिया सरकारने शाळांमध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरुणांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आजारांचे प्रमाण वाढल्याचं कारण सांगितलं जात आहे. एनर्जी ड्रिंक्स इतकं धोकादायक का मानलं जातं, जर तुम्ही एनर्जी ड्रिंक्स प्यायलात तर ते शरीराचं काय नुकसान करतं? हे जाणून घेऊया...
एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असते आणि जेव्हा तुम्ही ही पेय पिता तेव्हा शरीर या साखरेला फॅट आणि ट्रायग्लिसराइड्सच्या स्वरूपात साठवतं. यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते आणि तुमचे ट्रायग्लिसराइड्स जास्त होऊ शकतात. यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. हायपरटेन्शनची समस्या असू शकते. भरपूर कॅफिन आणि साखर असलेले एनर्जी ड्रिंक ब्लड प्रेशर वाढवू शकतात. म्हणूनच या सर्व गोष्टी हृदयासाठी चांगल्या नाहीत.
जेव्हा तुम्ही अशी एनर्जी ड्रिंक्स घेता तेव्हा शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. यामुळे एंग्जायटी लेव्हल वाढते. याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. काही लोकांना निद्रानाश, डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्या सुरू होतात. एनर्जी ड्रिंक्समध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असल्याने ॲसिडिटी वाढू शकते. तुम्ही कोणतंही एनर्जी ड्रिंक जास्त वेळ प्यायल्यास त्यामुळे गॅस्ट्र्रिटिस होऊ शकते. ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतं. मळमळ होऊ शकते. त्यामुळे एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करू नका.
एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असतं. कॅफिनचं जास्त प्रमाण शरीराला डिहायड्रेट करतं. डिहायड्रेशनचा किडनीवर परिणाम होऊ लागतो. लहान मुलं किंवा तरुणांनी असे एनर्जी ड्रिंक घेतल्यास त्यांच्या मेंदूच्या विकासाला हानी पोहोचते. अशा मुलांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि त्यांच्यात बदल होऊ लागतात.