Eating with hands Benefits : आपण पाहिलं असेलच की, पाश्चात्य देशांमधील लोक सामान्यपणे काटे-चमचे हाती घेऊन जेवण करतात. पण भारतात फार आधीपासून ही परंपरा नाही. आपल्याकडे लोक हातानं जेवण करतात. पण अलिकडे लोक स्टेटसचा विचार करून हातानं जेवण्याऐवजी चमच्यांचा वापर करतात. ही पद्धत चांगली वाटत असली तरी आरोग्यासाठी नक्कीच चांगली नाही. ही फक्त परंपरा नसून आरोग्यदायी सवय आहे. हाताने जेवल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तेच आज आपण पाहणार आहोत.
हाताने जेवण्याचा सल्ला का दिला जातो?
डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
पचन सुधारतं
बोटांनी जेवणाला स्पर्श केल्यावर शरीराला आधीच पचनासाठी तयार होण्याचा संकेत मिळतो. आपल्या बोटांतील नर्व्ह एंडिंग्स थेट आतड्यांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे पचन एंझाइम्स सक्रिय होतात आणि जेवण पटकन पचन होण्यास मदत मिळते. ज्यांना अॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही सवय फायदेशीर आहे.
जेवणाचा स्पीड
हाताने जेवल्यास आपण हळूहळू खातो, प्रत्येक घास नीट चावला जातो. यामुळे अन्न नीट पचतं आणि पोषक तत्त्वे शरीराला मिळतात. चमच्याने किंवा काट्याने खाल्ल्यास आपण पटकन खातो, ज्यामुळे पचन बिघडू शकतं.
मेंदू आणि अन्नाचं कनेक्शन मजबूत होतं
आपण शाळेत शिकलोय की पचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते. हाताने अन्न उचलताना तोंडात पाणी सुटू लागते, जे पचनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जेवणाचं मानसिक नातं अधिक घट्ट होतं.
गट हेल्थ आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर
हाताने जेवल्यामुळे पचन सुधारतं, गट मायक्रोबायोम निरोगी राहतो. यामुळे इम्युनिटी वाढते, झोप सुधारते आणि ताण कमी होतो.
माइंडफुल ईटिंगला प्रोत्साहन
आजकाल बहुतेक लोक मोबाईल पाहत जेवतात. त्यामुळे मन आणि शरीर अन्नाचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाही. हाताने जेवल्यास आपण अन्नावर लक्ष केंद्रीत करतो आणि माइंडफुल ईटिंगची सवय लागते.
काय काळजी घ्याल
हाताने जेवण्याचे फायदे मिळण्यासाठी हात स्वच्छ धुणं खूप महत्त्वाचं आहे.
घाणेरड्या हाताने जेवल्यास बॅक्टेरिया व इन्फेक्शनचा धोका वाढतो.
म्हणूनच जेवणाआधी हात साबणाने नीट धुवा.
नखंही लहान व स्वच्छ ठेवा.