Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात तिखट-झणझणीत खाताना लक्षात ठेवा ५ गोष्टी-पोट खराब होऊन पुढची धावपळ टळेल

उन्हाळ्यात तिखट-झणझणीत खाताना लक्षात ठेवा ५ गोष्टी-पोट खराब होऊन पुढची धावपळ टळेल

Eating Spicy Food in Summer? Remember These 5 Tips to Prevent Stomach Upset and Digestive Trouble : तिखट खा पोटभर. फक्त लक्षात ठेवा या टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 17:21 IST2026-03-05T17:14:45+5:302026-03-05T17:21:04+5:30

Eating Spicy Food in Summer? Remember These 5 Tips to Prevent Stomach Upset and Digestive Trouble : तिखट खा पोटभर. फक्त लक्षात ठेवा या टिप्स.

Eating Spicy Food in Summer? Remember These 5 Tips to Prevent Stomach Upset and Digestive Trouble | उन्हाळ्यात तिखट-झणझणीत खाताना लक्षात ठेवा ५ गोष्टी-पोट खराब होऊन पुढची धावपळ टळेल

उन्हाळ्यात तिखट-झणझणीत खाताना लक्षात ठेवा ५ गोष्टी-पोट खराब होऊन पुढची धावपळ टळेल

झणझणीत, चमचमीत पदार्थ खाण्याची मजा वेगळीच असते. मसालेदार भेळ, पाणीपुरी, तिखट मिसळ, चायनीज किंवा मसालेदार घरगुती पदार्थ अनेकांना खूप आवडतात. मात्र असे पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना अॅसिडिटी, जळजळ, पोटात दुखणे किंवा घशात त्रास जाणवतो. (Eating Spicy Food in Summer? Remember These 5 Tips to Prevent Stomach Upset and Digestive Trouble)त्यामुळे चवही मिळाली पाहिजे आणि त्रासही होऊ नये यासाठी काही साध्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे झणझणीत पदार्थ पूर्णपणे रिकाम्या पोटी खाणे टाळावे. पोट अगदी रिकामे असेल तर तिखट मसाले थेट पोटाच्या आतील आवरणावर परिणाम करतात आणि त्यामुळे जळजळ वाढते. म्हणून आधी थोडे हलके खाऊन मग तिखट पदार्थ खाल्ले तर पोटावरचा ताण कमी होतो.

तिखट पदार्थ खाताना लिंबाचा रस वापरणे खूप फायदेशीर ठरते. अनेकदा चाट, भेळ, मिसळ किंवा तिखट पदार्थांवर लिंबू पिळले जाते. लिंबामधील घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करतात. त्यामुळे चवही वाढते आणि पोटालाही थोडा आराम मिळतो. त्याचप्रमाणे तूप देखील तिखटपणा संतुलित करण्यासाठी उपयोगी ठरते. गरम भातावर किंवा पोळीवर थोडेसे तूप घालून तिखट भाजी किंवा आमटी खाल्ली तर तिखटपणाचा परिणाम थोडा सौम्य होतो. तूप पचनासाठी मदत करते आणि पोटाच्या आतील आवरणाला थोडे संरक्षणही देते.

तिखट पदार्थ खाताना सावकाश आणि चाऊन खाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घाईघाईत खाल्ले तर पोटावर अधिक ताण येतो आणि अपचनाचा त्रास वाढू शकतो. तसेच एकदम खूप तिखट खाण्याऐवजी मध्यम प्रमाणात खाणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

अशा पदार्थांबरोबर दही, ताक किंवा काकडीसारख्या थंड गुणधर्माच्या गोष्टी खाव्यात. शरीराला संतुलन मिळते. मसाल्याचा उष्ण परिणाम कमी करण्यासाठी या गोष्टी खूप उपयोगी ठरतात. पाणीही एकदम जास्त न पिता थोड्या थोड्या प्रमाणात प्यावे.

तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच झोपणे किंवा लगेच चहा-कॉफी पिणे टाळावे. थोडावेळ चालणे किंवा बसून राहणे चांगले असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. थोडक्यात, झणझणीत आणि चमचमीत पदार्थ खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्याबरोबर काही छोट्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. लिंबू, तूप, दही यांचा योग्य वापर, मध्यम प्रमाण आणि शांतपणे खाण्याची सवय ठेवली तर चवही मिळते आणि पोटालाही त्रास होत नाही. त्यामुळे तिखट पदार्थांची मजा मनमोकळेपणाने घेता येते.

Web Title : पेट ख़राब किए बिना गर्मी में तीखा खाएं: 5 उपाय।

Web Summary : गर्मी में तीखा खाना पसंद है? पेट भरकर खाएं, नींबू/घी मिलाएं, धीरे खाएं, दही जैसे ठंडे पदार्थों के साथ खाएं, और तुरंत सोने से बचें। एसिडिटी से बचें।

Web Title : Enjoy spicy food this summer without stomach upset: 5 tips.

Web Summary : Love spicy food? Avoid acidity this summer by eating on a full stomach, adding lemon/ghee, eating slowly, pairing with cooling foods like yogurt, and avoiding immediate naps.