Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Eating Order : चांगल्या तब्येतीसाठी जेवताना आधी काय खायचं अन् शेवटी काय खायचं? तज्ज्ञ सांगितली जेवण्याची योग्य पद्धत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:14 IST

Eating Order : थाळी दाखवताना  यांनी स्पष्ट केले की, तुम्ही ज्या क्रमाने पदार्थ खाता त्याचा परिणाम तुमच्या वय आणि शरीराच्या वजनासह हार्मोन्सवर होतो

अगदी सुरुवातीपासून आपण ऐकत आलो आहोत की तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमी हेल्दी फूड खावे. संतुलित आहार आणि पुरेसा व्यायाम केल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता. तुम्हाला कल्पना नसेल पण तुमच्या ताटात दिलेले जेवण ज्या क्रमाने खातात त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो?  न्यूट्रिशनिस्ट पूजा माखिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या विषयावर चर्चा केली आहे.  इंस्टाग्राम रील्समध्ये तिने 'कार्ब नंतर आधी भाज्या आणि प्रोटीन का खावे' हे स्पष्ट केले.

या व्हिडीओत  वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी भरलेलं ताट प्लेटमध्ये दिसत आहे. पूजा यांच्या ताटात टोमॅटो आणि हिरव्या भाज्या, चपाती आणि एक वाटी डाळ, भात आणि दोन करी असे पदार्थ आहेत.  थाळी दाखवताना  यांनी स्पष्ट केले की, तुम्ही ज्या क्रमाने पदार्थ खाता त्याचा परिणाम तुमच्या वय आणि शरीराच्या वजनासह हार्मोन्सवर होतो. न्यू यॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिकल कॉलेजमधील संशोधकांनी अहवाल दिला आहे की लठ्ठ लोकांमध्ये जेवणानंतरचे ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी ठरवण्यात विविध प्रकारचे अन्न कोणत्या क्रमाने वापरले जाते.

कार्ब्स आधी भाज्या आणि प्रोटिन्स घ्यायला हवेत

डायबिटीज केअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात  इंसुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्बोहायड्रेट्सपूर्वी भाज्या आणि प्रथिने खाण्याबाबत माहिती दिली आहे. संशोधन अभ्यास जेवणाच्या क्रमावर जोर देतो आणि असे गृहीत धरतो की जेव्हा कार्बोहायड्रेट्सपूर्वी भाज्या आणि प्रथिने खाल्ले जातात तेव्हा 30, 60, 120-मिनिटांच्या चाचण्यांमध्ये ग्लुकोजची पातळी 29 टक्के, 37 टक्के आणि 17 टक्के कमी होती. याव्यतिरिक्त, जेव्हा सहभागींनी प्रथम भाज्या आणि प्रथिने खाल्ले, तेव्हा इन्सुलिन लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आढळले. आजारांचा धोका आणि क्रेविंग्सही कमी होतात.

वेल कॉर्नेल येथील सेंटर फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह वेट कंट्रोलचे संचालक डॉ. लुई आरॉन म्हणतात की, या संशोधनाच्या आधारे डॉक्टर त्यांच्या रुग्णांना 'हे खाऊ नका' ऐवजी 'हे आधी खा' असे सांगू शकतात. असे केल्याने चांगले हार्मोनल संतुलन, चांगली प्रजनन क्षमता चांगली होऊन आजारांचा धोका कमी होतो. 

ही माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करत पूजा माखिजा यांनी लोकांना चांगले अन्न पण स्मार्ट फूड खाण्याचा सल्ला दिला आहे. या हॅकसह उत्तम आरोग्यासाठी योग्य क्रमाने आपल्या जेवणाचा आनंद घ्या. निरोगी खाण्याच्या सवयी हा मधुमेह नियंत्रणात ठेवण्‍याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल