Leftover Pizza Side Effects: गरमागरम पिझ्झा खाणं केवळ लहान मुलांनाच नाहीतर मोठ्यांना सुद्धा आवडतं. बाहेरून ऑर्डर केलेला पिझ्झा कधी कधी शिल्लक राहतो. अशात बरेच लोक असेही असतात, जे पैसे वाया जाऊ नये म्हणून किंवा आवड म्हणून रात्री शिल्लक राहिलेला पिझ्झा सकाळीही खातात. अनेकांना तर हा शिल्लक राहिलेलाच पिझ्झा अधिक टेस्टी लागतो. तो पुन्हा गरम करून खातात.
पण अनेकांना हे माहीत नाही की, ही आपली सवय आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकते. आज आपण शिळा पिझ्झा खाण्याचे नुकसान काय होतात, हे समजून घेणार आहोत.
फूड पॉयजनिंग
पिझ्झामध्ये चीज, प्रोसेस्ड मीट आणि सॉससारख्या गोष्टी असतात. जर या गोष्टी योग्यपणे स्टोर केल्या गेल्या नाही तर त्यात बॅक्टेरिया तयार होतात. जर पिझ्झा दोन तासांपेक्षा जास्त रूम टेम्परेचरवर ठेवत असाल तर त्यात साल्मोनेला आणि ई. कोलाई सारखे नुकसानकारक बॅक्टेरिया तयार होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण हा पिझ्झा खाता तेव्हा फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो. ज्यामुळे पोटदुखी, उलटी, जुलाब आणि ताप अशा समस्या होऊ शकतात.
पचन तंत्र बिघडतं
शिळा पिझ्झा खाल्ल्यानं आपल्या पचन तंत्रावर थेट प्रभाव पडतो. मुळात पिझ्झाचा बेस मैद्यापासून बनवला जातो, जो असहजपणे पचत नाहीत. जेव्हा पिझ्झा शिळा होतो, तेव्हाच त्याला पचवणं आणखी अवघड होतं. यामुळे पोट फुगणं, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्या होऊ शकतात.
लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका
पिझ्झाममध्ये कॅलरी, फॅट आणि सोडिअमचं प्रमाण फार जास्त असतं. सकाळी उपाशीपोटी हा शिळा पिझ्झा खाल तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते किंवा अचानक कमी होऊ शकते. ज्यामुळे आपला सुस्तपणा वाढू शकतो, चिडचिड वाढू शकते आणि पुन्हा भूक लागू शकते. इतकंच नाही तर यामुळे हृदयरोगाचा धोकाही वाढतो.
काय कराल?
पिझ्झा जर शिल्लक राहिला तर त्याला दोन तासांच्या आता एअर टाइट कन्टेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा
शिळा पिझ्झा खाण्याआधी चांगल्या पद्धतीनं गरम करा. जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील.