Join us

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक, हृदयाच्या आरोग्यावर पडतो वाईट प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:21 IST

रोज ब्रेड खाल्ल्यानं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात रोड ब्रेड खाल्ल्यानं कोणत्या समस्या होतात हे जाणून घेऊ.

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड खाल्ल्यानं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात रोड ब्रेड खाल्ल्यानं कोणत्या समस्या होतात हे जाणून घेऊ.

हृदयासाठी नुकसानकारक

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ब्रेडमध्ये सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतं. सॅच्युरेटेड फॅटमुळे हृदयासंबंधी समस्या गंभीर होऊ शकते आणि जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला हृदय निरोगी आणि मजबूत ठेवायचं असेल तर ब्रेड खाणं बंद केलं पाहिजे.

लठ्ठपणा

कार्बोहायड्रेट्स आणि शुगर रिच ब्रेड लठ्ठपणाचा कारण बनतात. एकदा का लठ्ठपणा वाढला तर शरीरात वेगवेगळे आजार घर करू लागतात. कारण लठ्ठपणा हा अनेक आजाारांचं मूळ आहे. रोज ब्रेड खाल्ल्यानं ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. ब्रेडमुळे रक्तात शुगर वाढते. त्यामुळे ब्रेड कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत. रोज ब्रेड खाण्याची सवय अनेक आजारांचा धोका वाढवते.

गट हेल्थवर प्रभाव

अनेकदा ब्रेड खाणाऱ्या लोकांना पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. ब्रेडमध्ये असलेला मैदा तुमच्या आतड्यांचं आरोग्य खराब करतो. ब्रेड पचन होण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे पचनासंबंधी अनेक समस्या होतात. ब्रेडमुळे अॅसिडिटी, जळजळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्या होणं कॉमन आहे. ब्रेड आणि चहा सकाळी खाल्ल्याने पोटातील आतड्यांना फोड येतात. ब्रेड पचनक्रियेसाठी नुकसानकारक आहे.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य