Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाकघरातील ३ पदार्थ खा-बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा टळेल धोका; सद्गुरू सांगतात सोपा उपाय

स्वयंपाकघरातील ३ पदार्थ खा-बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा टळेल धोका; सद्गुरू सांगतात सोपा उपाय

Eat These Three Ingredients For Boost Immunity : सद्गुरूंनी सांगितल्यानुसार, हे तीन घटक एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:10 IST2025-10-18T09:08:00+5:302025-10-18T09:10:02+5:30

Eat These Three Ingredients For Boost Immunity : सद्गुरूंनी सांगितल्यानुसार, हे तीन घटक एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Eat These Three Ingredients For Boost Immunity Immunity Booster Tips Says Sadhguru Jaggi Vasudev | स्वयंपाकघरातील ३ पदार्थ खा-बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा टळेल धोका; सद्गुरू सांगतात सोपा उपाय

स्वयंपाकघरातील ३ पदार्थ खा-बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा टळेल धोका; सद्गुरू सांगतात सोपा उपाय

रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे किती महत्त्वाचे आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. योग आणि अध्यात्मावर मार्गदर्शन करणारे सद्गुरू जग्गी वासुदेव हे केवळ आत्मिक कल्याणासाठीच नव्हे, तर शारीरिक आरोग्यासाठीही वेळोवेळी पारंपारिक आणि प्रभावी उपाय सांगत असतात. असाच एक उपाय जो सध्या खूप चर्चेत आहे, तो म्हणजे आवळा, मध आणि काळी मिरी यांचा एकत्रित वापर. सद्गुरूंनी सांगितल्यानुसार, हे तीन घटक एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या संसर्गांना दूर ठेवण्यास मदत मिळते. (Eat These Three Ingredients For Boost Immunity)

हे मिश्रण कसे तयार कराल?

हे मिश्रण तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे,जी तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता

आवश्यक साहित्य

आवळा-३ ते ५ मध्यम आकाराचे आवळे

मध-४ चमचे 

काळी मिरी : १ चमचा


कृती-

आवळे स्वच्छ धुऊन त्यांचे छोटे छोटे तुकडे करा आणि बिया काढून टाका. एका काचेच्या भांड्यात हे आवळ्याचे तुकडे घ्या. त्यात कुटलेली काळी मिरी आणि मध घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. हे मिश्रण झाकून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे आवळा आणि मिरीतील गुणधर्म मधात व्यवस्थित उतरतात.

सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, उत्तम परिणामांसाठी हे मिश्रण दिवसातून तीन वेळा, तीन चमचे सेवन करावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी मानले जाते. नियमितपणे ४ ते ८ आठवडे हा उपाय केल्यास रोगप्रतिकारशक्तीत लक्षणीय सुधारणा दिसून येते.

आवळा  हा व्हिटॅमिन 'सी' चा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे, जो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक आहे.यात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे श्वसनमार्गाचे संसर्ग आणि अन्य आजारांपासून संरक्षण करतात.

मधाला नैसर्गिक अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल मानले जाते. हे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. मधामुळे आवळ्याची आंबट चव कमी होते आणि मिश्रण गिळण्यास सोपे जाते.

काळी मिरी शरीरातील रक्तपेशी  वाढवण्यास मदत करते आणि शरीराला विषाणू तसेच जीवाणूंशी लढण्यास बळ देते. यात असलेले 'पाइपरीन'नावाचे संयुग रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि आवळ्यातील पोषक तत्वांचे शरीरात शोषण अधिक प्रभावीपणे होण्यास मदत करते. हा आवळा, मध आणि काळी मिरीचा उपाय म्हणजे निसर्गाच्या साध्या आणि शक्तिशाली घटकांचा वापर करून रोगप्रतिकारकशक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्याचा एक उत्तम आणि पारंपरिक मार्ग आहे. हंगाम बदलताना किंवा संसर्गाचा धोका असताना, हा उपाय आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

Web Title : सद्गुरु का रसोई त्रिकुट: प्रतिरक्षा बढ़ाएँ, संक्रमणों से बचें!

Web Summary : सद्गुरु आंवला, शहद और काली मिर्च का मिश्रण प्रतिरक्षा को बढ़ावा देने का सुझाव देते हैं। यह मिश्रण संक्रमणों के प्रतिरोध को बढ़ाता है। सर्वोत्तम परिणामों के लिए दिन में तीन बार तीन चम्मच का सेवन करें। आंवला, शहद और काली मिर्च आवश्यक पोषक तत्व और गुण प्रदान करते हैं।

Web Title : Sadhguru's Kitchen Trio: Boost Immunity, Avoid Infections Naturally!

Web Summary : Sadhguru suggests a blend of amla, honey, and black pepper boosts immunity. This mix enhances resistance to infections. Consume three teaspoons thrice daily for best results. Amla, honey, and black pepper provide essential nutrients and properties.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.