Join us

दह्यात लपलंय व्हिटामिन-बी१२ वाढवण्याचं खास सिक्रेट! दह्यात कालवा ३ पदार्थ, वाढेल बी - १२ लवकर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 17:17 IST

Curd Hides The Secret To Increasing Vitamin B12 Just Mix & Eat These 3 Things : Eat these things by mixing them with curd, Vitamin B12 will increase at double the speed : Mixing These 3 Things In Curd Can Help Cure Vitamin B12 Deficiency Naturally : दह्यासोबत कोणते पदार्थ मिसळून खाल्ल्यास व्हिटॅमिन बी - १२ ची कमतरता भरुन निघते, ते पाहा...

शरीराला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स प्रमाणेच व्हिटॅमिन्सची देखील तितकीच आवश्यकता असते. शरीरातील व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. व्हिटॅमिन बी - १२ (Mixing These 3 Things In Curd Can Help  Cure Vitamin B12 Deficiency Naturally) च्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. भारतीयांच्या आहारात दह्याला (Curd Hides The Secret To Increasing Vitamin B12 Just Mix & Eat These 3 Things) खास महत्व आहे. आपल्याकडे दह्याला प्रोटीनचे भांडार मानले जाते.रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्याने व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्णपणे भरुन काढता येते. व्हिटॅमिन बी - १२ हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे आपल्याला केवळ ऊर्जाच देत नाही तर आपला मेंदू, नसा आणि रक्तपेशींना निरोगी ठेवते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेकांना हे माहित नाही की ही कमतरता दूर करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही(Eat these things by mixing them with curd, Vitamin B12 will increase at double the speed).

फक्त दही आणि काही नेहमीच्या वापरातील खास पदार्थ मिसळून खाल्ल्याने, आपण आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी - १२ चे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवू शकता. असे ३ पदार्थ कोणते आहेत जे दह्यासोबत मिसळून खाल्ल्यास  शरीरातील व्हिटॅमिन बी - १२ ची कमतरता भरुन निघते, ते पाहूयात. 

दह्यात मिसळा फक्त हे ३ पदार्थ... 

१. भाजलेले तीळ :- विशेषतः पांढरे तीळ, व्हिटॅमिन 'बी' कॉम्प्लेक्सने समृद्ध असतात. जेव्हा आपण दह्यात पांढरे तीळ मिसळून खाता तेव्हा ते फक्त दह्याची चवचं वाढवत नाही तर शरीराला व्हिटॅमिन बी - १२ शोषण्यास देखील मदत करते. दह्याच्या प्रोबायोटिक गुणधर्मांसोबतच तिळातील निरोगी फॅट्स देखील पचन सुधारतात. एक चमचा भाजलेले तीळ दह्यात मिसळा आणि ते नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात घ्या.

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर... 

२. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये आयर्न, फायबर आणि व्हिटॅमिन बी - १२ फार मोठ्या प्रमाणांत असतात. यासोबतच मेथी दाणे खाल्लेल्या अन्नपदार्थांचे पचन करण्यासोबतच अन्नपदार्थांतील पोषक तत्व शोषून घेण्यास देखील मदत करतात. जेव्हा आपण मेथी दाणे दह्यात मिसळून खातो तेव्हा दह्याची पौष्टिकता तर वाढतेच शिवाय, शरीरातील व्हिटॅमिन बी - १२ वाढवण्यात देखील मदत होते. रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून घ्यावेत सकाळी पाणी गाळून मेथी दाणे दह्यात मिसळून खावेत. 

पाय बारीकच पण गुडघे मात्र जाडजूड-ढब्बे? ५ उपाय- गुडघ्यांवरची चरबी घटून गुडघे दुखीही गायब...

३. चिया सीड्स :- चिया सीड्स खाण्याचा अलिकडे ट्रेंडच आला आहे. चिया सीड्स पौष्टिकतेने समृद्ध आहेत. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि विशेषतः व्हिटॅमिनचे बी फार मोठ्या प्रमाणावर असतात. दह्यामध्ये चिया सीड्स मिक्स करून खाल्ल्याने पचन सुधारेल आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील भरुन निघेल. १ चमचा चिया सीड्स १५ मिनिटे पाण्यात भिजवा. नंतर ते दह्यात मिसळा आणि खा, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चवीसाठी त्यात थोडे मध देखील घालू शकता.

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सअन्न