आपल्यापैकी अनेकांना दुपारची झोप ही अतिशय प्रिय असते. दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या झोपेला कुणीच अडवू शकत नाही. काहीजणांना तर जेवणानंतर किमान १० ते १५ मिनिटे एक छोटीशी झोप काढायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपेची सवय असणाऱ्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी असताना आपण थेट झोपू शकतो पण (foods to prevent post lunch sleepiness) ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर झोप येत(foods to prevent post lunch sleepiness)असेल तर काय करावं असा प्रश्नच पडतो. ऑफिसमध्ये दुपारचं जेवण झाल्यावर झोप येणं ही अनेकांची फारच कॉमन समस्या आहे. यामुळे कामात लक्ष लागत नाही आणि ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं( rujuta diwekar two foods that help with the afternoon slump).
जेवणानंतर दुपारची झोप आवरणं मोठं कठीण काम असतं. अशा परिस्थिती, झोप येऊ नये म्हणून आपण अनेक उपाय करतो. परंतु खरंतरं, आपण टिफिनमध्ये कोणते पदार्थ नेत आहोत याचा आपल्या दुपारनंतरच्या एनर्जी लेव्हलवर थेट परिणाम होतो. काही हलके, पचायला सोपे आणि पौष्टिक पदार्थ टिफिनमध्ये आणले तर दुपारचा आळस आणि झोप (eat 2 foods in lunch to avoid post lunch afternoon slump) घालवण्यास मदत होते व कामातही उत्साह टिकून राहतो. यासाठीच, सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर यांनी दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, टिफिनमध्ये किंवा दुपारच्या जेवणात दोन पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. हे दोन पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहूयात...
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून...
दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, जेवणात कोणते दोन पदार्थ हमखास खावेत याविषयी ऋतुजा दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, त्या अशा दोन पदार्थांविषयी सांगत आहेत, जे दुपारच्या जेवणात खाल्ल्यामुळे आपल्याला दुपारची झोप टाळता येऊ शकते.
वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करणारे ५ देसी पदार्थ! बॅड कोलेस्टेरॉल राहते कायमचे दूर...
कोणते आहेत ते दोन पदार्थ...
१. साजूक तूप:- शक्यतो, जेवणात साजूक तूप खाल्ल्याने आपल्याला तेलकट पदार्थ खाऊन सुस्ती किंवा आळस येईल असे वाटते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ आणि बी–१२ ची कमतरता आहे अशांनी आहारात चमचाभर साजूक तूप जरूर खावे. वजन कमी करण्यासाठी, थायरॉईड, पिगमेंटेशन, बद्धकोष्ठता यांसारख्या वेगवेगळ्या समस्यां कमी करण्यासाठी चमचाभर साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरते. साजूक तूप खाणे सोडण्यापेक्षा आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणात चमचाभर साजूक तुपाचा समावेश केल्याने दुपारची झोप आवरण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते.
डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट...
२. चटणी :- दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चटणी. दुपारच्या जेवणात चटणीचा समावेश नक्की करावा. चटणी कोणत्याही प्रकारची असली तरी ती आवर्जून खावीच. आपण खोबर्याची, नारळाची, कढीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आवडतील अशा चटण्या दुपारच्या जेवणात खाऊ शकता. यामुळे दुपारची झोप आवरण्यास मदत होऊ शकते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. दिवसाभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.
२. ऑफिसमध्ये दिवसभर एकाच जागी न बसता, ठराविक तासानंतर उठून थोडे फिरून यावे.
३. दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. शक्यतो तेलकट - तुपकट किंवा पचायला जड पदार्थ खाणे टाळावे.
४. गरजेपेक्षा जास्त जेवू नये, दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे.
५. दुपारच्या जेवणात भात योग्य प्रमाणात खावा. जास्त खाणे टाळावे.