अनेक आजारांपैकी 'डायबिटीस' हा देखील एक असाच फार कॉमन आजार आहे. डायबिटीस होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अगदी लहान वयातच डायबिटीस (natural way to reduce diabetes risk with vegetables) होण्याची देखील शक्यता असते. चुकीच्या खाण्या - पिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलमधील बदलांमुळे अनेकजण या आजाराला बळी पडत आहेत. एकदा का डायबिटीस (6 vegetables to prevent diabetes naturally) झाला की, तो पूर्णपणे बरा न होता फक्त त्यावर नियंत्रण ठेवणे हा एकच पर्याय आपल्या हाती असतो. डायबिटीस वेळीच नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि आपल्या खाण्या - पिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे असते(Eat 6 best vegetables daily to reduce risk of diabetes naturally).
डायबिटीस असणाऱ्यांनी आपल्या आहाराबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे. काही भाज्या अशा आहेत, ज्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करतात. या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर नैसर्गिक घटक मुबलक प्रमाणात असल्याने, अशा भाज्या रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. डायबिटीस नियंत्रणात (vegetables that lower blood sugar levels) ठेवण्यासाठी आहारात अशा भाज्यांच्या समावेश करणे फायद्याचे ठरते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या ५ भाज्यांच्या समावेश करायला हवाच ते पाहूयात...
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हव्याच अशा ५ भाज्या...
१. दोडकं आणि तोंडली :- दोडकं आणि तोंडली या दोन्ही भाज्या डायबिटीस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तोंडलीमध्ये असलेले कुकुर्बिटासिन बी (Cucurbitacin B) आणि टेरपेनोइड्स (Terpenoids) रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी इन्सुलिनच्या कार्यासारखे कार्य करतात. तर, दोडक्यामध्ये असलेले ॲपिजेनिन (Apigenin) आणि ल्युटोलिन (Luteolin) इन्सुलिनचे स्राव आणि ग्लुकोजचे शोषण वाढवतात.
तेल की तूप, फोडणीसाठी काय फायदेशीर ? ९९% लोकांना माहीतच नसते रोजची १ चूक - होते आरोग्याचे नुकसान...
२. पडवळ :- पडवळ ही व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबरयुक्त अशी पौष्टिक भाजी आहे, जी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. ही भाजी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे मुख्य काम करते. पडवळ इन्सुलिनची पातळी सुधारण्यास आणि ग्लुकोजची वाढ कमी करण्यास मदत करते.
डायबिटीस राहील नियंत्रणात, फक्त फॉलो करा १०-१०-१० चा नियम - पोषणतज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी कराच...
३. कारलं :- डायबिटीस असणाऱ्यांसाठी कारले अनेक प्रकारे फायदेशीर अशी भाजी मानली जाते. कारल्याची भाजी, रस किंवा इतर अनेक पद्धतींनी आहारात समावेश केल्याने डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. कारल्यामध्ये असलेले चारेंटीन (Charantin) आणि पॉलीपेप्टाइड-पी (Polypeptide-P) रक्तातील साखर कमी करण्यासाठी नैसर्गिक इन्सुलिन प्रमाणे कार्य करतात.
४. गवार :- अनेकजणांना गवारीच्या भाजीची चव अजिबात आवडत नाही, परंतु गवारीची भाजी म्हणजे अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. कमी कॅलरी आणि फायबरयुक्त अशी ही गवारीची भाजी खाल्ल्याने डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास अधिक जास्त मदत होते. गवारमधील गम (एक प्रकारचा विद्रव्य फायबर) कार्बोहायड्रेट्सचे शोषण हळू करते आणि जेवणानंतर आचणकपणे होणारी रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित करते.