Join us

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 17:22 IST

Eat 2 Foods In Lunch To Avoid Post Lunch Afternoon Slump Rujuta Diwekar : Kareena Kapoor's nutritionist Rujuta Diwekar says eat these 2 foods for lunch to avoid that afternoon slump : Two foods that help with the afternoon slump : दुपारची झोप आवरत नाही, निरुत्साही - थकल्यासारखे वाटते अशावेळी कोणते दोन पदार्थ खावेत, ते पाहा...

दुपारची झोप अनेकांना फारच प्रिय असते. आपल्यापैकी काहीजणांना तर जेवल्यानंतर किमान अर्धा तास तरी झोपायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपण्याची सवय (Eat 2 Foods In Lunch To Avoid Post Lunch Afternoon Slump Rujuta Diwekar) असलेल्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी (Kareena Kapoor's nutritionist Rujuta Diwekar says eat these 2 foods for lunch to avoid that afternoon slump) असताना तर आपण झोपू शकतोच परंतु ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. अशावेळी आपण झोप येऊ नये म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करुन पाहतो. असे असले तरीही काहीजणांना दुपारची झोप ऑफिसमध्ये आवरताच येत नाही(Two foods that help with the afternoon slump).

जेवणानंतर काहीजणांना झोप येते, आळस आल्यासारखे वाटते, काम करू नये, थकवा वाढतो, चीडचीड होते. यासाठी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, दुपारच्या जेवणात दोन पदार्थ हमखास खाण्याचा सल्ला दिला आहे. हे दोन पदार्थ नेमके कोणते ते पाहूयात. 

दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून... 

दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून, जेवणात कोणते दोन पदार्थ हमखास खावेत याविषयी ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, त्या अशा दोन पदार्थांबद्दल सांगत आहेत, जे दुपारच्या जेवणात खाल्ल्याने आपल्याला दुपारची झोप टाळता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात हे दोन पदार्थ समाविष्ट केले तर झोप न येता तुम्हाला फ्रेश वाटेल आणि काम करायला उत्साह येईल. 

कोणते आहेत ते दोन पदार्थ... 

१. साजूक तूप :- शक्यतो, जेवणात साजूक तूप खाल्ल्याने आपल्याला तेलकट पदार्थ खाऊन सुस्ती किंवा आळस येईल असे वाटते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन 'डी' आणि बी - १२ ची कमतरता आहे अशांनी आहारात चमचाभर साजूक तूप जरुर खावे. वजन कमी करण्यासाठी, थायरॉईड, पिगमेंटेश, बद्धकोष्टता यासारख्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी चमचाभर साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरेल. साजूक तूप खाणे सोडण्यापेक्षा आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणात चमचाभर साजूक तुपाचा समावेश केल्याने दुपारची झोप आवरण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी करण्यासाठी साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते. 

बॉडी डिटॉक्ससाठी शिल्पा शेट्टीने असं काय केलं की, वाढला गुगल सर्च - व्हायरल फिटनेस फंडा...

२. चटणी :- दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चटणी. दुपारच्या जेवणात चटणीचा समावेश नक्की करावा. चटणी कोणत्याही प्रकारची असली तरी ती आवर्जून खावीच. आपण खोबऱ्याची, नारळाची, कडीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आवडतील अशा चटण्या दुपारच्या जेवणांत खाऊ शकता. यामुळे दुपारची झोप आवरण्यास मदत होऊ शकते. 

वेटलॉससाठी चपाती खाणं सोडताय ? 'या' पिठाची चपाती खा - कमी वेळात जास्त वजन कमी करण्याचे सिक्रेट...

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. दिवसभरात पुरेशा प्रमाणांत पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.  २. ऑफिसममध्ये दिवसभर एकाच जागी न बसता, ठराविक तासानंतर उठून थोडे फिरून यावे.  ३. दुपारच्या जेवणात पौष्टिक आहार घ्यावा. शक्यतो तेलकट - तुपकट किंवा पचायला जड पदार्थ खाणे टाळावे.  ४. गरजेपेक्षा जास्त जेवू नये. दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे.  ५. दुपारच्या जेवणात भात योग्य प्रमाणांत खावा. जास्त खाणे टाळावे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नफिटनेस टिप्सलाइफस्टाइल