Belly Fat Or Bloating : आपण रोज आरशात बघतो, आरशात बघून स्वत:ला न्याहाळताना अनेकांना असं वाटतं की, आपलं पोट अधिक वाढलंय. पोट बघून अनेकांना प्रश्न पडतो की, हे ब्लोटिंगमुळे आहे की, खरंच पोटावरील चरबी वाढली आहे? कारण दोन्ही स्थितीत पोट वाढलेलं दिसतं. पण पोट मोठं दिसण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. खरंच पोटावर चरबी वाढलीये की केवळ ब्लोटिंगमुळे पोट वाढलेलं दिसतं याची ओळख पटवणं खूप महत्वाचं ठरतं. अशात आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, पोट नेमकं कशामुळे वाढलेलं दिसतं.
वेळ सगळ्यात मोठा संकेत
ब्लोटिंग नेहमीच वेळेशी संबंधित असते. सामान्यपणे जेवणानंतर पोट फुगतं आणि सकाळी झोपेतून उठल्यावर पोट सपाट दिसतं. गॅस बाहेर पडल्यावर किंवा टॉयलेटला गेल्यावरही ब्लोटिंग कमी होते. याउलट, बेली फॅटचा वेळेशी काही संबंध नसतो. दिवस असो किंवा रात्र, पोटाचा आकार जवळपास तसाच राहतो. जर सकाळी पोट सपाट वाटतं आणि संध्याकाळपर्यंत बाहेर येतं, तर बहुतेक वेळा ते ब्लोटिंग असतं.
कपड्यांचा प्रॉब्लेम
ब्लोटिंगमध्ये सकाळी कपडे आरामात फिट होतात, पण संध्याकाळपर्यंत तीच पँट टाइट वाटू लागते. रात्रीपर्यंत वेस्टबँड टोचल्यासारखं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सैल वाटतं. बेली फॅटमध्ये मात्र कपड्यांचा फिट दिवसभर एकसारखाच राहतो. कंबरजवळ टाइटनेस सतत जाणवतो, वेळेचा फरक पडत नाही.
पोटाला हात लावल्यावर कसं वाटतं?
ब्लोटिंगमध्ये पोट कडक, ताणलेलं वाटतं. हलका दाब दिला तरी अस्वस्थता जाणवू शकते. बेली फॅट वाढलं असेल तर मात्र पोट मऊ आणि स्पंजी वाटतं. दाबल्यावर वेदना होत नाहीत. पोटाला हात लावून पाहणं हा ब्लोटिंग आणि फॅटमधला फरक ओळखण्याचा सोपा मार्ग आहे.
हालचाल आणि पचनाचे संकेत
ब्लोटिंगसोबत गॅस, ढेकरा, बद्धकोष्ठता किंवा पोट जड वाटणं अशी लक्षणं दिसतात. थोडं चालणं, स्ट्रेचिंग करणं किंवा टॉयलेटला गेल्यावर पोटाचा आकार कमी होऊ शकतो. बेली फॅटवर मात्र या गोष्टींचा लगेच काहीच परिणाम होत नाही.
थोडक्यात काय लक्षात ठेवावं?
जर पोटाचा आकार दिवसभर बदलत असेल आणि सकाळी सपाट वाटत असेल, तर ते ब्लोटिंग आहे. पण पोट कायम एकसारखं बाहेर आलेलं दिसत असेल, तर ते बेली फॅट असू शकतं, जे हेल्दी लाइफस्टाइलच्या मदतीने कमी करता येतं.
Web Summary : Is it belly fat or just bloating? Bloating fluctuates throughout the day, often improving in the morning. Belly fat remains consistent. Bloating feels tight; fat feels soft. Movement helps bloating, not fat.
Web Summary : क्या यह पेट की चर्बी है या सिर्फ ब्लोटिंग? ब्लोटिंग दिन भर में बदलती रहती है, सुबह बेहतर होती है। पेट की चर्बी स्थिर रहती है। ब्लोटिंग में कसाव महसूस होता है; चर्बी नरम लगती है। हिलने-डुलने से ब्लोटिंग ठीक होती है, चर्बी नहीं।