Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कानातला मळ साफ करण्याची सोपी ट्रिक! हे तेल २ थेंब कानात घाला, चिकट मळ पटकन निघेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:34 IST

Easy trick to clean earwax : काहीजण कानात पेन वगैरे असे टोकादार साहित्य घालतात त्यामुळे कानातून रक्त येणं, कान सूजणं अशा समस्या उद्भवू शकतात.

 हिवाळ्याच्या दिवसांत कानात मळ जमा होण्याची समस्या कॉमन आहे. कानातला मळ बाहेर काढण्यासाठी लोक माचिसची काडी वापरतात जे तब्येतीच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकतं. आयुर्वेद तज्ज्ञांच्यामते मोहोरीचं तेल हलकं गरम करून कानात घातल्यानं कानातील मळ नरम होऊन बाहेर निघतो. पण तुम्हाला कोणतंही संक्रमण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. काहीजण कानात पेन वगैरे असे टोकादार साहित्य घालतात त्यामुळे कानातून रक्त येणं, कान सूजणं अशा समस्या उद्भवू शकतात. (Easy trick to clean earwax)

हिवाळ्याच्या दिवसांत शरीरातील ड्रायनेस वाढतो. ज्याचा परिणाम कानांवरही होतो. हिवाळ्याच्या दिवसांत कानात मळ जास्त प्रमाणात तयार होतो. ज्यामुळे कमी ऐकू येणे, कानात वेदना, खाज येणं, चक्कर येणं कानांच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा कानाच्या नळ्या ब्लॉकसुद्धा होतात. ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो आणि कर्णबधिरपणा येतो.

पोट सुटलं-कंबरही वेडंवाकडं बेढब दिसतंय? १ पारंपरिक उपाय- वाढलेली चरबीही घटू लागेल झरझर

लोक कानांची सफाई करण्यासाठी सुई, माचिसची काडी किंवा अन्य टोकदार वस्तूंचा वापर करतात. ज्यामुळे कानांच्या पडद्यांना नुकसान पोहोचू शकतं. हेच लक्षात घेता आयुर्वेद तज्ज्ञांनी कानातील मळ काढण्यासाठी काही घरगुती सोपे, सुरक्षित उपाय सांगितले आहेत.

 या पद्धतीनं सहज बाहेर काढा कानातला मळ

शरीरातील कोरडेपणामुळे कानातील मळ घट्ट होतो. सामान्य स्थितीत हा मळ कानांतील बॅक्टेरिया, धूळ आणि किटाणूंपासून वाचवण्याचे काम करतो. हे लक्षात घेता आयुर्वेद तज्ज्ञांनी कानातील मळ सुरक्षितपणे काढण्याचे घरगुती उपाय सांगितले आहेत. डॉ. हर्ष सांगतात की कानांची सफाई करण्यासाठी पिन, सुई किंवा माचिसची काडी यांसारख्या वस्तूंचा वापर करू नका. कारण यामुळे कानांच्या पडद्यांना नुकसान  पोहोचू शकतं. 

रात्री जेवण झाल्यावर या ८ गोष्टी करा, जीमला न जाता झरझर उतरेल चरबी; सुडौल-बारीक दिसाल

त्यांनी सांगितले की कानांतील मळ काढून टाकण्याचा सुरक्षित घरगुती उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑईल. ऑलिव्ह ऑईल हलकं गरम करून कानात घातल्यानं काही वेळानंतर कानात साचलेला मळ आपोआप बाहेर निघेल. तुम्ही मोहोरीच्या तेलाचा वापरही करू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy earwax removal trick: Use this oil for quick cleaning!

Web Summary : A simple trick to remove earwax involves using warm mustard or olive oil. This softens the wax, allowing it to come out easily. Avoid using sharp objects to prevent ear damage. Consult a doctor if you have an infection.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल