Join us

अचानक ब्लड प्रेशर लो होते, चक्कर येते, पायात गोळे येतात? ६ उपाय, लो बीपी त्रास कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 14:11 IST

Easy Remedies For Low Blood Pressure : रक्तदाब कमी झाल्याची काही सामान्य लक्षणे असतात ती माहिती असायला हवीत.

ब्लड प्रेशर कमी होणे किंवा जास्त होणे ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयस्कर व्यक्तींना होणारा हा त्रास आता तरुणांमध्येही दिसू लागला आहे. ताणतणाव, अनुवंशिकता यांसारख्या बाबी यासाठी कारणीभूत असल्या तरी अन्नातून पुरेसे पोषण न मिळणे हे ब्लड प्रेशर कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. व्हिटॅमिन बी-12, फोलेट आणि लोहाची कमी पातळी शरीराला पुरेशा लाल रक्त पेशी (अ‍ॅनिमिया) तयार करण्यापासून रोखते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे डीहायड्रेशन आणि हृदयाच्या तक्रारींमुळेही रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. रक्तदाब कमी झाल्याची काही सामान्य लक्षणे असतात ती माहित करुन घेणे आणि त्याकडे लक्ष ठेवून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते (Easy Remedies For Low Blood Pressure). 

ब्लड प्रेशर कमी झाल्याची लक्षणे 

१. अंधुक किंवा कमी झालेली दृष्टी

२. अचानक येणारा घाम

३. चक्कर येणे किंवा अचानक डोके दुखणे

(Image : Google)

४. अचानक बेशुद्ध पडणे

५. लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे

६. थकवा आल्यासारखे वाटणे

७. अचानक मळमळल्यासारखे होणे 

उपाय काय ? 

१. रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मनुका सकाळी रीकाम्या पोटी खाणे अतिशय फायदेशीर असते.

२. शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. किमान १२ ग्लास पाणी दररोज प्यायला हवे. 

३. आहारात फळं आणि भाज्यांचा भरपूर प्रमाणात समावेश करणे.

४. पालक आणि गाजराचा ज्यूस करुन तो पिणे, ज्यामुळे लोह आणि व्हिटॅमिन बी १२ ची पातळी चांगली राहण्यास मदत होते. 

५. रक्तदाब योग्य राहावा यासाठी आवळ्याचा रस फायदेशीर ठरतो. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत असल्याने आहारात रोज १ आवळा घ्यायलाच हवा. 

६. दररोज न चुकता ५ ते ६ तुळशीची पाने खावीत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल