गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तसेच सतत उभं राहणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. दीर्घकाळ उभं राहणं, वजन वाढ, वाढतं वय, संधिवात किंवा स्नायूंवरील ताण यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना (Easy Homemade Knee Pain Relief Oil Recipes) जाणवते. या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय शोधणं अनेकांसाठी आवश्यक असते. गुडघेदुखीवर आपण घरच्याघरीच अनेक घरगुती उपाय देखील करु शकतो. या उपायांपैकीच सगळ्यांत सोपा आणि सर्वोत्तम असा घरगुती उपाय (Natural Homemade Ayurvedic Pain Relief Oil for Knee Pain) म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले औषधी तेल. अशा प्रकारच्या घरगुती तेलामध्ये वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये वेदनाशामक, सूज कमी करणारे आणि उष्णता नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. अशा घरगुती तेलाचा रोज वापर केल्याने गुडघ्यांची दुखणी हळूहळू कमी होतात आणि सांध्यांमध्ये लवचिकता येते(Easy Home Made Ayurvedic Oil for Knee Pain).
तीळाचे तेल, लसूण पाकळ्या, ओवा, लवंग, मोठी वेलची, सुंठ पावडर, जायफळ पावडर यांसारखे नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले तेल सांध्यांवर चोळल्यास वेदना कमी होतात, सूज उतरते आणि गुडघेदुखी कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरच्याघरी तेल कसं तयार करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ zenfit_glow या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. गुडघेदुखीसाठी घरच्याघरीच तेल कसं तयार करायचं ते पाहूयात.
साहित्य :-
१. तीळाचे तेल - १ कप
२. लसूण पाकळ्या - ७ ते ८ लसूण पाकळ्या
३. ओवा - १ टेबलस्पून
४. लवंग - ४ ते ५ लवंग काड्या
५. मोठी वेलची - १ मोठी वेलची
६. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून
७. जायफळ पावडर - १/२ टेबलस्पून
गरोदरपणात कियारा अडवाणीच्या चेहऱ्यावर तेज, आरोग्यासाठी ‘या’ सवयी गरोदरपणातही लाख मोलाच्या...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात तिळाचे तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या, ओवा, लवंग, मोठी वेलची, सुंठ पावडर, जायफळ पावडर असे सगळे जिन्नस घालावेत.
२. आता गॅसच्या मध्यम आचेवर हे भांड ठेवून तेल हळूहळू चमच्याने ढवळत राहून उकळवून घ्यावे.
३. तेलाचा रंग बदलून हलकासा सोनेरी होईपर्यंत तेल चांगले उकळवून घ्यावे.
४. आता तेल थोडे थंड होऊ द्यावे तेल थंड झाल्यावर ते बारीक जाळीदार गाळणीने गाळून घ्यावे.
५. गाळून घेतलेले तेल एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करुन ठेवावे.
व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...
या तेलाचा वापर कसा करावा ?
रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल एका वाटीत घेऊन हलकेसे गरम करावे. या गरम तेलाने गुडघ्याची मालिश करावी. हा उपाय दररोज केल्यास गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.