Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दीमुळे कान ठणकतोय? पाहा ५ घरगुती उपाय, दुखरा कान होईल बरा-त्रास जाईल पळून

सर्दीमुळे कान ठणकतोय? पाहा ५ घरगुती उपाय, दुखरा कान होईल बरा-त्रास जाईल पळून

Earache due to cold? Simple home remedies, avoid making some mistakes : सर्दीमुळे कान दुखत असेल तर करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 16:17 IST2025-09-09T16:16:26+5:302025-09-09T16:17:18+5:30

Earache due to cold? Simple home remedies, avoid making some mistakes : सर्दीमुळे कान दुखत असेल तर करा हे उपाय.

Earache due to cold? Simple home remedies, avoid making some mistakes | सर्दीमुळे कान ठणकतोय? पाहा ५ घरगुती उपाय, दुखरा कान होईल बरा-त्रास जाईल पळून

सर्दीमुळे कान ठणकतोय? पाहा ५ घरगुती उपाय, दुखरा कान होईल बरा-त्रास जाईल पळून

सर्दी झाली की अनेकांना नाक बंद होणे, घशात खवखव, ताप येणे याबरोबरच कानातही वेदना जाणवतात. सर्दी झाल्यावर असे का होते असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे कारण म्हणजे आपल्या कान, नाक आणि घसा या तिन्हीचा थेट संबंध असतो. कानाच्या आतील भागाला घसा आणि नाकाशी जोडणारी यूस्टेशियन ट्यूब नावाची नळी असते. (Earache due to cold? Simple home remedies, avoid making some mistakes )सर्दीमुळे ही नळी सूजल्यास किंवा बंद झाल्यास कानावर ताण पडायला लागतो. त्यामुळे कान दुखू लागतो. लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसते कारण त्यांची यूस्टेशियन ट्यूब लहान आणि नाजूक असते.

कान दुखणे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायद्याचे ठरतात. सर्वात सोपा उपाय म्हणजे वाफ घेणे. नाकासोबत कानालाही आराम मिळतो. गरम पाण्याच्या वाफेमुळे नाक-घसा मोकळा होतो आणि कानावरचा दाब कमी होतो. थोडंसं गरम तेल (जसे की तीळ किंवा खोबरेल तेल) कानाभोवती हलक्या हाताने मालीश केल्यासही आराम मिळतो. तेल अगदी कोमट असावं एकदम गरम नाही. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने घशातील सूज कमी होते आणि कानाच्या वेदनाही कमी होतात. भरपूर गरम पाणी पिणे, सूप, हळदीचे दूध पिणे हे शरीराला उब देते आणि सर्दी कमी करण्यास मदत करते.

कान दुखत असताना कानात थेट काहीच टाकू नये, अगदी कान कोरणीही नाही. विशेषतः औषध किंवा तेल टाकण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कानात कापसाचे बोळे सतत ठेवणे टाळावे, त्याऐवजी कान कोरडा व स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. विश्रांती घेणे आणि शरीर उबदार ठेवणेही उपचाराचा भाग मानला जातो.

जर कानातील वेदना दीर्घकाळ टिकली, खूप तीव्र झाली, कानातून पाणी किंवा पस येऊ लागला किंवा ऐकण्यास त्रास होऊ लागला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय फक्त सौम्य त्रासासाठी उपयुक्त ठरतात, मात्र संसर्ग गंभीर असल्यास औषधोपचार गरजेचे ठरतात. थोडक्यात सांगायचे तर, सर्दीमुळे कान दुखण्याचे कारण म्हणजे कान-नाक-घसा यांचा परस्पर संबंध आणि त्यात निर्माण होणारा दाब. वेळेवर केलेले सोपे घरगुती उपाय वेदना कमी करतात आणि आराम मिळवून देतात.

Web Title: Earache due to cold? Simple home remedies, avoid making some mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.