Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या, जाणून घ्या याची कारणं...

पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या, जाणून घ्या याची कारणं...

Ear infection in Monsoon : पावसाळ्यात कानात इन्फेक्शन (Ear infection) पसरण्याचा धोका अधिक असतो. याची कारणं जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:28 IST2025-05-26T17:27:25+5:302025-05-26T17:28:05+5:30

Ear infection in Monsoon : पावसाळ्यात कानात इन्फेक्शन (Ear infection) पसरण्याचा धोका अधिक असतो. याची कारणं जाणून घेऊया.

Ear Infections: How to Prevent Its Causes During Monsoon? | पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या, जाणून घ्या याची कारणं...

पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या, जाणून घ्या याची कारणं...

Ear infection in Monsoon : पाऊस आला की, थंड थंड सरींमध्ये भिजण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. लहान मुले असो वा मोठे सगळेच पावसात भिजून पावासाचा आनंद घेतात. तर बरेच लोक रस्त्या अचानक पाऊस आल्यानं भिजतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या दिवसात फंगल, बॅक्टेरिअल आणि वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. असाच एक अवयव म्हणजे कान. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन (Ear infection) पसरण्याचा धोका अधिक असतो. याची कारणं जाणून घेऊया.

कानात इन्फेक्शन होण्याची कारणं?

पावसाच्या दिवसांमध्ये कानात इन्फेक्शन होण्याची कारणं वेगवेगळी असतात. हे इन्फेक्शन कानाच्या वरच्या भागावर आणि कानाच्या आत होऊ शकतं. अशात याची कारणं जाणून घेऊ.

पावसात भिजल्यामुळे...

पावसाळ्यात कानात इन्फेक्शन होण्याचा सगळ्यात जास्त धोका पावसात भिजल्यामुळे होतो. कानात संक्रमण व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. खासकरून स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया किंवा हिमोफिलस इनफ्लुएंजा बॅक्टेरिया याला कारणीभूत असतात. हे सामान्यपणे तुमच्या यूस्टेशिअन ट्यूबच्या ब्लॉकेजमुळे होतं. ज्यामुळे कानात एक द्रव्य तयार होतं. यूस्टेशियन ट्यूब एक छोटी ट्यूब असते जी तुमच्या कानापासून थेट गळ्यापर्यंत जाते. पावसाळ्यात कानात जेव्हा ओलावा राहतो तेव्हा हे बॅक्टेरिया पसरतात आणि इन्फेक्शनचं कारण ठरतात.

साबणाचं पाणी

पावसाळ्यात आधीच सगळीकडे ओलावा असतो. अशात साबणाचं पाणी जर कानात आत तसंच राहीलं तर इन्फेक्शन सहजपणे होतं. या पाण्यामुळे कानात इन्फेक्शन सहजपणे होतं. जे नंतर आतपर्यंत जातं. त्यामुळे आंघोळ केल्यावर कान चांगले पुसा.

स्वीमिंग

पावसाळ्यात स्वीमिंग पूलसारखी ठिकाणं फंगल आणि बॅक्टेरियासाठी प्रजननाची मुख्य स्थळं असतात. स्वीमिंग पूलच्या पाण्यामुळे तुम्हाला सहजपणे इन्फेक्शन होऊ शकतं. या इन्फेक्शनमुळे कानात खाज आणि वेदना होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करणं टाळलं पाहिजे.

कानात इन्फेक्शन झाल्याची लक्षणं

- कानात झोपताना वेदना होणे

- झोप न लागणे

- आवाज ऐकणे किंवा प्रतिक्रिया देण्याची समस्या

- ताप

- कानातून द्रव्य पदार्थ निघणे

- डोकेदुखी

या सर्वच कारणांमुळे पावसाळ्यात कानात इन्फेक्शन होतं. अशात तुम्ही या दिवसात आंघोळ करताना कानात कॉटन टाकून ठेवू शकता. पावसात भिजल्यावर कानात पाणी गेल्याचं जाणवत असेल तर वेळीच कान साफ करा.

Web Title: Ear Infections: How to Prevent Its Causes During Monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.