लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलेलो असतो ते म्हणजे उभ्यानं पाणी पिऊ नये. कितीही घाई असेल तरी पाणी बसून प्यावं असं घरातील वयस्कर लोक सांगतात, याशिवाय अन्न सावकाश चावून खावं, जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असे बरेच सल्ले आपल्याला घरात किंवा बाहेर ऐकायला मिळत असतात. काहीजण असा दावा करतात की उभ्यानं पाणी प्यायल्यास पाणी थेट गुडघ्यांमध्ये जातं. ज्यामुळे जॉईंट्स पेनची समस्या उद्भवू शकता. या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का ते समजून घेऊ. (Does Drinking Water While Standing Damage Knees Is There Any Side Effects Or Just A Myth Nutritionist Reveals)
जेव्हा या पद्धतीचा दावा केला जातो तेव्हा हे समजून घेणं गरजेचं आहे की खरंच पाणी प्यायल्यानं ज्वाईंट्स खराब होतात का. सांधे निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात हायड्रेशन गरजेचं असतात. जेणेकरून गुडघ्यांना पोषण मिळेल. डिहायड्रेशनमुळे सांध्यांमध्ये वेदना उद्भवू शकतात. यातून कळून येतं की पाणी हे सांध्यांसाठी खराब नाही.
न्युट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी हे एक मिथक असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाणी थेट गुडघ्यांपर्यंत जात नाही किंवा कार्टिलेजेसना नुकसानही पोहोचवत नाही. डायड्रेशन सायनोव्हियन फ्लुइडला टिकवून ठेवतं. जे कार्टिलेजेसचं रक्षण करते आणि मुव्हमेंट स्मूद करते. त्यामुळे अशा दाव्यांवर लक्ष देऊ नये. बहूतांश लोक हा विचार करतात की पाणी शरीरात जातं आणि बाहेर येतं. पण जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा ते आतड्यातून काही मिनिटातं रक्त प्रवाहात शोषलं जातं ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि मेटाबॉलिझ्म वाढतं.
पांढरे केस जास्तच वाढलेत? १ घरगुती उपाय, डाय-मेहेंदी काहीच न लावता काळेभोर होतील केस
एका दिवसाला किती पाणी प्यावं? (How Much Water Should Drink Daily)
शरीर हायड्रेट ठेवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पाणी व्यवस्थित पिणं, रोज किती प्रमाणात पाणी प्यावं याबाबत लोक गोंधळात असतात. रोज जवळपास 15.5 कप आणि महिलांच्या आरोग्यासाठी 11.5 कप पाणी प्यायला हवं. पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही भाज्या, हर्बल टी चे सुद्धा सेवन करू शकता.
शरीरा हायड्रेट आहे ते कसं कळेल?
युरीनचा रंग हलका पिवळट असेल तर हे हायड्रेशनचं साईन आहे. योग्य प्रमाणात शरीर हायड्रेट राहिल्यास तहान कमी लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते.