Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चहावर लगेच पाणी पिऊ नये असं नेहमीच ऐकतो, पण जर प्यायलं तर नेमकं काय होईल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:25 IST

Why not to drink water after tea: बरेच लोक असे असतात ज्यांना हे माहितीच नसतं की, चहा प्यायल्यावर पाणी का पिऊ नये. ही सवय चांगलीच आहे.

Why not to drink water after tea: चहा पिणं अनेकांची रोजची सवय असते. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची चांगली सुरूवातच होत नाही. आपण नेहमीच घरातील मोठ्यांकडून ऐकत असतो की, चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिऊन नये. जास्तीत जास्त लोक ही बाब लक्षात ठेवून चहा प्यायल्यावर पाणी पिणं टाळतात. पण तरीही बरेच लोक असे असतात ज्यांना हे माहितीच नसतं की, चहा प्यायल्यावर पाणी का पिऊ नये. ही सवय चांगलीच आहे. पण चहा घेतल्यावर पाणी प्यायल्यास नेमकं काय होतं हे आपण समजून घेणार आहोत. 

काय आहे कारण? 

मुळात या सल्ल्याचं मुख्य कारण हे आहे की, चहा गरम असतो आणि पाणी थंड किंवा नॉर्मल असतं. अशात गरम गोष्टीवर जर थंड काही प्याल किंवा खाल तर याने शरीरात काही गडबड होऊ शकते. गरमागरम चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यावर नेमक्या काय समस्या होऊ शकतात हे पाहुयात.

पोटात होईल बिघाड  

जर आपण चहा प्यायल्यावर लगेच पाणी प्याल तर शरीराचं तापमान असंतुलित होईल. गरमागरम चहानंतर पाण्याने पोटाचं तापमान अचानक कमी होतं. या चुकीमुळे आपल्या गट हेल्थचं नुकसान होऊ शकतं. आपलं पचन तंत्र स्लो होऊ शकतं. या सवयीमुळे पोट जड वाटू शकतं किंवा गॅसची समस्या होऊ शकते.

सेन्सिटिव्हिटीची समस्या

गरम चहावर लगेच पाणी प्याल तर याने तोंडाचं आरोग्य देखील प्रभावित होतं. अचानक तापमान बदलल्यामुळे दाताच्या इनॅमलवर नकारात्मक प्रभाव पडतो. या चुकीमुळे दातांना झिणझिण्या येऊ शकतात. दातांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चहावर पाणी पिण्याची ही सवय वेळीच बदलायला हवी.

चहा घेतल्यावर कधी प्यावं पाणी?

जर आपल्याला पाणी प्यायचंच असेल तर चहा घेण्याआधी प्यावं. जर आपल्याला अॅसिडिटी, गॅस किंवा छाती जळजळीची समस्या होत असेल तर चहा घेण्याच्या साधारण १५ मिनिटांआधी पाणी प्यावं. असं केल्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या कमी केली जाऊ शकते. चहा घेतल्यावर आपण साधारण अर्ध्या तासानंतर पाणी पिऊ शकता.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स