Join us

काय सांगता रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिऊ नये? तज्ज्ञ सांगतात, रात्री जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 14:09 IST

Drinking Water Before Bed: Is It Healthy? रात्री झोपण्यापूर्वी नेमके कधी केव्हा आणि किती पाणी प्यावे?

''जल हे तो कल हे'', पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. आपल्या आरोग्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. उत्तम आरोग्य राखण्यासाठी पाणी पीत राहण्याचा सल्ला मिळतो. सामान्यत: असे म्हटले जाते की एका व्यक्तीने दिवसभरात किमान ८  ग्लास पाणी प्यावे. चांगल्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे.

पण काही लोकं रात्रीच्या समयी म्हणजेच झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पितात. पण झोपण्यापूर्वी पाणी प्यावं की नाही? रात्री पाणी किती प्यावे? रात्री पाणी प्यायल्याने शरीराला किती धोका आहे? अशा प्रश्नांच्या संदर्भात, नोएडाच्या डाएट मंत्राच्या संस्थापक डायटीशियन कामिनी सिन्हा यांनी माहिती दिली आहे(Drinking Water Before Bed: Is It Healthy?).

''रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. झोपण्यापूर्वी १ तास आधी पाणी प्यावे. झोपण्यापूर्वी दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. दूध प्यायल्याने शरीराला प्रोटीन मिळते. जे आरोग्यासाठी चांगले आहे. आपल्याला जर तहान लागली असेल तर, पाणी पिणे योग्य ठरेल, पण तहान लागलेली नसताना पाणी पिणे ही सवय टाळा. जास्त पाणी प्यायल्यानंतर लगेच झोपल्यास चेहऱ्यावर व हाता - पायांवर सूज येते. याला वॉटर रिटेन्शन किंवा एडेमा म्हणतात.''

उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून ३ टिप्स, ऐनवेळी दूध नासण्याची भीतीच उरणार नाही..

बद्धकोष्ठता असलेल्या रुग्णांनी किती पाणी प्यावे?

डायटीशियनच्या मते, ''ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी रात्री थोडे पाणी पिऊन झोपावे. पण सकाळी रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्यावे. ज्यामुळे या समस्येपासून आराम मिळेल, व पचनक्रिया सुधारेल. दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक. जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहेल. किडनी स्टोनच्या रुग्णांनी उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.''

रसाळ आंब्याचा सिझन आला, पण आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की केमिकल घालून, कसे ओळखाल?

झोपण्यापूर्वी पाण्यापेक्षा दूध प्या

यासंदर्भात कामिनी सांगतात, ''रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. काही लोकं रात्रीचं जेवण हलकं करतात , दूध प्यायल्याने भूक लागणार नाही. आपण जर बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर, झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्या. यामुळे थकवा दूर होऊन झोप चांगली लागेल.  

टॅग्स : दूधपाणीहेल्थ टिप्सआरोग्य