आपले लाईफस्टाईल आणि नेहमीच्या सवयीयामुळे आरोग्याच्या काही तक्रारी सतावतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती लाईफस्टाईल, स्ट्रेस घेणे, जंक फूड खाणे (Drinking Tulsi Tea Relieve Gas Problem) यांसारख्या सवयींमुळे अपचन,गॅस, फोट फुगणे यांसारख्या (Home remedy to reduce gas in the stomach in the morning) समस्या त्रास देतात. सुरुवातील अपचन,गॅस, फोट फुगणे यांसारख्या समस्या अगदी लहान - सहान असल्याने आपण सगळेच कित्येकदा (home remedy for gas relief) त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु वारंवार असे दुर्लक्ष केल्याने आपल्याला पचन आणि पोटासंबंधित अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काही प्राथमिक आणि घरगुती उपचार म्हणून आपण तुळशीच्या पानांचा वापर करु शकतो(Home remedy to reduce gas in the stomach in the morning).
खरंतर, अपचन,गॅस, फोट फुगणे यांसारख्या समस्यांवर तुळशीची पाने उपयुक्त आणि औषधी असतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि पचन सुधारक गुणधर्म असतात, जे पोटाच्या त्रासांपासून आराम देतात. आयुर्वेदानुसार तुळशीची पाने पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून नैसर्गिक पद्धतीने सुटका मिळवता येते. रामहंस चॅरिटेबल हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ. श्रेय शर्मा यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीनुसार, तुळशीच्या पानांचा चहा हा गॅस व अपचनाच्या त्रासावर अत्यंत फायदेशीर ठरतो.
गॅस व अपचन यांसारख्या समस्येवर तुळशीच्या पानांचा चहा पिण्याचे फायदे...
आयुर्वेदामध्ये तुळशीला एक औषधी वनस्पती मानले आहे. तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक आरोग्यविषयक तक्रारींवर केला जातो. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या जसे की अपचन, गॅस, पोट फुगणे, सूज आणि जळजळ यावर तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत फायदेशीर मानला जातो. आयुर्वेदाचार्य सांगतात की तुळशीच्या चहामध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे पोटातील स्नायूंना आराम देतात आणि साचलेला वायू बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे पोट हलकं वाटतं आणि जडपणा कमी होतो. शिवाय, यामुळे पोटाची सूज व जळजळही कमी होते. तुळशीचा चहा नियमितपणे घेतल्यास पचनसंस्था मजबूत राहते आणि शरीराला नैसर्गिक रीतीने डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
१. तुळशीमध्ये असणारे युजेनॉल नावाचे संयुग पोटात जास्त गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते आणि पचनक्रिया सुधारते.
२. तुळशीचा चहा आपल्या शरीरातील पाचक रसांचे स्रव सक्रिय करतो, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्य पद्धतीने पचते.
३. तुळशीचा चहा पचनसंस्थेवर सौम्य पण प्रभावी परिणाम करत असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
'या' ५ चुकांमुळेच डाएट-व्यायाम करूनही वजन कमी होत नाही! पोषणतज्ज्ञ सांगतात, काय घोळ होतो...
४. अॅसिडिटी कमी करण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर ठरतो. यामुळे गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते.
५. काही वेळा मानसिक तणावामुळेही पोटात गॅस तयार होतो. तुळशीमध्ये असलेले अॅडाप्टोजेन तणाव कमी करण्यात मदत करते, ज्यामुळे पचन सुधारते.
एनसीबीआयच्या अभ्यास संशोधनातून असे दिसून आले आहे की तुळशीच्या पानांचा रस आणि चहामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. यामुळे चयापचय समस्या दूर होतात आणि पचन सुधारते. अशा प्रकारे, तुम्हाला गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
तुळशीच्या पानांचा चहा कसा करायचा ?
तुळशीच्या पानांचा चहा करण्यासाठी, ८ ते १० ताजी तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. एका भांड्यात २ कप पाणी उकळायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर, तुळशीची पाने हाताने थोडीशी कुस्करून त्यात घाला. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा, म्हणजेच सुमारे १० मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या.
सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...
चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून तुम्ही त्यात एक चमचा मध किंवा लिंबाचा रसही घालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा प्यायल्याने अधिक फायदा होतो. दिवसातून दोन कपपेक्षा जास्त तुळशीचा चहा पिऊ नका. हा नैसर्गिक चहा नियमित घेतल्यास पचन सुधारते, पोटातील गॅस कमी होतो आणि शरीराला हलकं वाटतं.