Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, शरीराला होते नुकसान, वेळीच घ्या काळजी

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, शरीराला होते नुकसान, वेळीच घ्या काळजी

Drinking cold water after hot food: Is cold water after meals harmful: Effects of cold water on digestion: अचानक थंड आणि गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 09:05 IST2025-05-29T09:00:00+5:302025-05-29T09:05:01+5:30

Drinking cold water after hot food: Is cold water after meals harmful: Effects of cold water on digestion: अचानक थंड आणि गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते जाणून घेऊया.

Drinking cold water after eating hot food bad habit effect health starting digestion and stomach pain problem | गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, शरीराला होते नुकसान, वेळीच घ्या काळजी

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात, शरीराला होते नुकसान, वेळीच घ्या काळजी

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो.(Drinking cold water after hot food) गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते.(Is cold water after meals harmful) थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. (Effects of cold water on digestion)
थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.(Bad habits after eating) तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते जाणून घेऊया. (Cold water health risks)

International Menstrual hygiene Day : मासिक पाळी म्हणजे विटाळ नव्हे, महिलांनी टाळायला हव्या ५ चुका

आरोग्यतज्ज्ञांच्या मते थंड पाणी शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करते. अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेत एन्झाईम्स आणि जठरासंबंधी रस सक्रिय असतात. ज्यावेळी आपण थंड पाणी पितो तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान अचानक कमी होते. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. खूप थंड पाणी पोटाची आग कमकुवत करते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. 

थंड-गरम पदार्थ खाल्ल्याने होणारा परिणाम 

1. शरीराचे तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअस असते. जर गरम पदार्थ खाल्ल्याने लगेच थंड पदार्थ खाल्ले तर शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. यामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवतात. 

2. जास्त थंड पाणी प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक तापमानावर परिणाम होतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत     होऊ शकते. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो. 

'या' आजाराने समंथा ग्रस्त, वजनही होतंय भरभर कमी, चाहत्यांना ओळखूही येईना...

3. थंड पाण्यामुळे पचन एंजाइमची प्रक्रिया मंदावते. या पचनाच्या समस्येमुळे शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. 

4. गरम पदार्थांसोबतच शरीराचे तापमान जास्त असताना थंड पाणी पिण्याची काळजी घ्यायला हवी. व्यायाम केल्यानंतर लगेच फ्रीजमधले पाणी पिणे शरीराला हानिकारक ठरु शकते. व्यायाम केल्यानंतर शरीर गरम होते आणि अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात बदल होतो. ज्यामुळे स्नायूंचा कडकपणा आणि थकवा वाढू शकतो.

 

Web Title: Drinking cold water after eating hot food bad habit effect health starting digestion and stomach pain problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.