Join us

ब्लॅक टी प्यायल्याने कमी होतो मृत्यूचा धोका? नव्या रिपोर्टचा दावा, वाचून आनंदाने काळा चहाच मागवाल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:22 IST

Black Tea Benefits : अभ्यासकांना आढळून आलं की, जास्त साखर टाकून किंवा सॅच्युरेटेड फॅट असलेली कॉफी प्यायल्यानं कोणतेही फायदे मिळत नाही.

Black Tea Benefits : जर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या एका शोधातून खुलासा झाला आहे की, रोज १ ते २ कप ब्लॅक कॉफी (Black Coffee) प्यायल्यास जीवाचा धोका १४ टक्क्यांनी कमी होतो, जर तुम्ही रोज २ ते ३ कप ब्लॅक टी प्याल तर अवेळी मृत्यूचा धोका १७ टक्के कमी होतो. जर कॉफी किंवा चहामध्ये दूध किंवा साखर टाकून पित असाल तर यानं काहीच फायदा मिळणार नाही.

अभ्यासकांना आढळून आलं की, जास्त साखर टाकून किंवा सॅच्युरेटेड फॅट असलेली कॉफी प्यायल्यानं कोणतेही फायदे मिळत नाही. हा रिसर्च द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या टफ्ट्स यूनिव्हर्सिटीतील लेखक आणि रिसर्चर फॅंग फॅंग झांग म्हणाले की, कॉफीचे हे फायदे त्यातील बायोअ‍ॅक्टिव तत्वांमुळे मिळतात. पण निष्कर्ष हे सांगतात की, कॉफीमध्ये साखर टाकल्यास किंवा फॅटचा वापर केल्यास कॉफीचे फायदे कमी होऊ शकतात.

ब्लॅक कॉफी कमी होतो मृत्यूचा धोका

अभ्यासकांनी 1999 ते 2018 पर्यंतच्या वेगवेगळ्या रिसर्चचं विश्लेषण केलं. ज्यात नॅशनल डेथसंबंधी माहिती होती. त्यांनी २० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या 46 हजारांपेक्षा जास्त तरूणांचे रिअ‍ॅक्शन बघितले. या रिसर्चमध्ये कॉफीचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करून त्याच्या फायद्यांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यात कॉफीचे टाइप, कॅफीनयुक्त वा कॅफीनरहीत, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटच्या निष्कर्षांचा अभ्यास करण्यात आला.

ब्लॅक टी मुळे मृत्यूचा १७ टक्के कमी धोका

अभ्यासकांनी सांगितलं की, ब्लॅक कॉफी पिऊन मृत्यूचा धोका १४ टक्के कमी राहतो. तर रोज जर २ ते ३ कप ब्लॅक टी प्याल तर अवेळी मृत्यूचा धोका १७ टक्क्यांनी कमी राहतो. कॉफी आणि ब्लॅक टी मुळे हृदयरोगांचा धोका कमी राहतो. तसेच यानं लिव्हरच्या कामात सुधारणा होते आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स