Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी सतावतात, पोट साफ होत नाही? कोमट पाण्यात मिसळा ५ पदार्थ - पोट राहील शांत...

उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी सतावतात, पोट साफ होत नाही? कोमट पाण्यात मिसळा ५ पदार्थ - पोट राहील शांत...

Drink These 5 Things Mixed In Water Every Morning To Clean Stomach During Summer Season : Morning Drink To Clean Stomach : उन्हाळ्यात पोट साफ होऊन आपले आरोग्य व तब्येत उत्तम ठेवण्यासाठी,नेमके कोणते आहेत घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 17:44 IST2025-05-22T17:28:41+5:302025-05-22T17:44:48+5:30

Drink These 5 Things Mixed In Water Every Morning To Clean Stomach During Summer Season : Morning Drink To Clean Stomach : उन्हाळ्यात पोट साफ होऊन आपले आरोग्य व तब्येत उत्तम ठेवण्यासाठी,नेमके कोणते आहेत घरगुती उपाय...

Drink These 5 Things Mixed In Water Every Morning To Clean Stomach During Summer Season Morning Drink To Clean Stomach | उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी सतावतात, पोट साफ होत नाही? कोमट पाण्यात मिसळा ५ पदार्थ - पोट राहील शांत...

उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी सतावतात, पोट साफ होत नाही? कोमट पाण्यात मिसळा ५ पदार्थ - पोट राहील शांत...

'पोट खुश तर आपण खुश' असे आपल्याकडे म्हटले जाते. आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणावर पोट आणि पचनतंत्रावर अवलंबून असतं. जेव्हा पोट व्यवस्थित (Morning Drink To Clean Stomach) असतं, तेव्हा शरीरात हलकेपणा जाणवतो, ऊर्जा टिकून राहते आणि मन प्रसन्न राहतं. याउलट, पोट बिघडल्यास चिडचिड, थकवा, आणि अस्वस्थता वाटते. शक्यतो, उन्हाळ्यात (Drink These 5 Things Mixed In Water Every Morning To Clean Stomach During Summer Season) वातावरणातील उष्णता, गरमी, वाढते तापमान यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या त्रास देतात.

उष्ण तापमानामुळे पचन प्रक्रिया मंदावते. अशा परिस्थितीत बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसारख्या समस्या वाढतात. काही लोकांना उन्हाळ्यात पोट साफ नसण्याची समस्या सतावते, यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ वाटते. पोट साफ न होण्याची ही समस्या जरी साधी वाटत असली, तरी ती दुर्लक्ष केली तर मोठ्या त्रासाचं कारण बनू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पोट साफ राहणं खूप महत्त्वाचं असत, यासाठीच उन्हाळ्यात पोट साफ होऊन आपले आरोग्य व तब्येत उत्तम ठेवण्यासाठी, सकाळी पाण्यासोबत कोणते पदार्थ मिसळून प्यायल्याने फायदा होतो ते पाहूयात.  

पोट साफ करण्यासाठी रोज सकाळी पाण्यात मिसळून प्या 'हे' ५ पदार्थ... 

१. कोमट पाण्यासोबत तूप :- गरम पाण्यात तूप घालून प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तूप बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारुन त्यांचे काम सुरळीत चालते. कोमट पाण्यात तूप घालून ते प्यायल्याने पोटात साचलेली घाण निघून जाते आणि पोट व्यवस्थित स्वच्छ होते. परंतु, ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी हा उपाय करु नये. याशिवाय, ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाबाची समस्या असेल त्यांना देखील हा उपाय त्रासदायक ठरु शकतो. 

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

२. कोमट पाणी व बडीशेप :- बडीशेपमध्ये थंडावा असतो, म्हणून उन्हाळ्यात दररोज बडीशेप खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. आयुर्वेदानुसार, बडीशेप पोटदुखीविरोधी उत्तम औषध आहे आणि पोटांत नैसर्गिक थंडावा निर्माण करते. ज्या लोकांना आम्लपित्त, पोटफुगी, बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या आहे त्यांनी कोमट पाण्यांत बडीशेप घालून ते पाणी पिणे अधिक फायदेशीर राहील. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या पोटाच्या तक्रारी दूर होऊन   तुमची पचनसंस्था देखील निरोगी राहील.

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

३. कोमट पाणी आणि जिरे :- कोमट पाण्यात जिरे घालून प्यायल्याने पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यास मदत होते. जर तुम्हाला पोटफुगी, अ‍ॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज सकाळी ग्लासभर पाण्यांत चमचाभर जिरे घालून ते पाणी पिण्याने अनेक फायदे होतात. पण, जिरे उष्ण असल्याने   शरीरात पित्त वाढू शकते. म्हणून, ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे त्यांनी हा उपाय करणे टाळावे. 

स्वयंपाकघरात तासंतास उभं राहून पाय दुखतात? ३ सोप्या गोष्टी, पाय-टाचा-कंबर दुखणार नाही...

४. कोमट पाणी आणि इसबगोल :- रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत इसबगोल घेतल्यास, पोट व्यवस्थित साफ होतं आणि दिवसभर हलकं वाटतं. हा एक सोपा, नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांपैकी एक आहे. बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटी या तक्रारी सतत होत असतील तर हा एक साधा आणि घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतो. इसबगोलमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे ते पचनसंस्थेमधील पाणी शोषून घेतं आणि मल नरम करतं. यामुळे आतड्यांचे कार्य देखील सुरळीत पद्धतीने होते. 

५. कोमट पाणी आणि चिया सीड्स :- कोमट पाण्यात चिया सीड्स घालून पिणे अतिशय फायदेशीर ठरते. चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने  आतड्यांचे आरोग्य सुधारते. चिया सीड्स भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेतात, यासाठीच चिया सीड्स कोमट पाण्यातून घेतल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि पोट स्वच्छ होते.

Web Title: Drink These 5 Things Mixed In Water Every Morning To Clean Stomach During Summer Season Morning Drink To Clean Stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.