चमचाभर साजूक तूप घालून दूध पिण्याची पद्धत आपल्या आयुर्वेदात जुनी असली तरी आजकाल हा उपाय वापरणे फार कमी झाले आहे. पण हे पेय पिण्यात उपयोगी ठरणारे अनेक फायदे आहेत. दूध आणि तूप ही दोन्हीही सहज पचणारे, स्निग्धता देणारे आणि उष्णतेचा समतोल राखणारे घटक आहेत. त्यामुळे हे मिश्रण शरीराला आतून पोषण देतो, थकवा कमी करते आणि पचनास मदत करते. (Drink milk mixed with ghee before going to bed - digestion will be easy and sleep will be peaceful.)त्यामुळे सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी असे दूध घेतले तर शरीराला आराम मिळतो आणि तणावही कमी होतो. जर पोट साफ होत नसेल तर आठवडाभर रोज झोपण्याापूर्वी कपभर तूप घालून गरम दूध प्या. नक्कीच आराम मिळेल.
साजूक तूप हे अनेक पोषणतत्वांचा उत्तम स्रोत आहे पण त्यातील गुणधर्म इतके सौम्य असतात की ते आतड्यांना त्रास न देता उलट त्यांना लुब्रीकेट ठेवतात. त्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास असेल तर तूप - दूध घेतल्याने मल मऊ होतो आणि सहजतेने साफ होतो. नियमित घेतल्यास पचनतंत्रावरचा ताण कमी होतो. दुधातील कॅल्शियम आणि प्रोटीन सांधेदुखी, थकवा आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. त्यात तूप मिसळल्यावर शरीर त्या पोषकतत्त्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करू शकते.
तूप हे मेंदूसाठी पोषक मानले जाते. चमचाभर तूप घातलेले दूध घेतल्यावर nerves शांत होतात, ताणतणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते. दिवसभरातील थकवा आणि मानसिक गोंधळ कमी करण्यासाठी हे एक साधे, नैसर्गिक पेय फार फायद्याचे ठरते. शिवाय हे मिश्रण त्वचेला आतून ओलावा देऊन कोरडेपणा कमी करते. विशेषतः थंडीत चेहरा, हात, पाय कोरडे पडत असतील तर अशा पेयामुळे स्निग्धता वाढून त्वचेची चमक टिकते.
यात अजून एक फायदा म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. तुपाचे पचन सुलभ आहे आणि त्यातील फॅटी ऍसिड्स, तर दुसरीकडे दुधातील प्रोटीन व जीवनसत्वे या दोन्हींचा एकत्रित प्रभाव शरीरातील सूक्ष्म दाह कमी करण्यास, ऊर्जेची पातळी योग्य ठेवण्यास आणि सर्दी-खोकला यांसारख्या वारंवार उद्भवणाऱ्या तक्रारींपासून संरक्षण देण्यास मदत करतो.
एकूणच चमचाभर साजूक तूप घालून दूध पिणे म्हणजे शरीराला सौम्य पण सातत्याने मिळणारे पोषण. पचन सुधारण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचा मऊ ठेवण्यासाठी, हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी हे साधे मिश्रण रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येते. नियमित घेतल्यास याचे परिणाम हळूहळू जाणवतात आणि शरीर सर्वांगाने अधिक संतुलित राहते.
