Join us

युरिक ॲसिड वाढलंय, सांधे दुखतात? उपाशीपोटी ‘हे’ पाणी प्या, दुखणं व्हायला लागेल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 10:44 IST

Green cardamom water benefits for uric acid: How to use cardamom water for uric acid: Green cardamom for gout relief: Uric acid removal with green cardamom: Natural remedies for high uric acid: Green cardamom health benefits: Drink cardamom water for gout prevention: जर आपल्या शरीरातील युरिक अॅसिड वारंवार वाढत असेल तर हा घरगुती उपाय करा.

चुकीचे खाणेपिणे, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिप्रमाणात खाणं, अपुरी झोप आणि कामाचा ताण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. (Green cardamom water benefits for uric acid) शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली की, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. (How to use cardamom water for uric acid) जेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांधेदुखी, हाडांचे दुखणे आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात ही लक्षणे दिसतात आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. (Green cardamom for gout relief)

परंतु, काही घरगुती उपाय केल्याने या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. अनेकदा सांधेदुखी किंवा हाडांते दुखणे सुरु झाले की, आपल्याला नीट उठता बसता येतं नाही. हाडांमधून आवाज येण्यासारख्या समस्या सुरु होतात. युरिक ॲसिड हे आपल्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आहे. जे शरीरा प्युरीनचे विघटन करून ॲसिड तयार करते. जर आपल्या शरीरातील युरिक ॲसिड वारंवार वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच हा घरगुती उपाय केल्याने फायदा होईल. 

1. रिकाम्या पोटी प्या पाणी 

रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरातील युरिक ॲसिडची वाढलेली पातळी नियंत्रणात राहिल. वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि विषारी पदार्थ काढण्याचे गुणधर्म आहेत. जे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करतात. शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे आरोग्य बिघडते. वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीरातून हानिकारक घटक बाहेर काढले जातात. ते शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. तसेच हे पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडात जमा झालेले हानिकारक घटक बाहेर पडतात. जर नियमितपणे सकाळी वेलीचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून देण्यास मदत होईल. 

2. वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

जेव्हा शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांध्यातील सूज, मूत्रमार्गाचे आजार किंवा किडनी स्टोन सारख्या समस्या उद्धवतात. या सर्व समस्यांवर वेलचीचे पाणी रामबाण उपाय आहे. यांमुळे हाडांचे आरोग्य सुधारते. हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असले तर हे पाणी जरुर प्या. वेलचीच्या पाण्यात भौतिक मूत्रवर्धक घटक आढळतात. वेलचीचे पाणी जास्त प्रमाणात प्यावे. यामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम लघवीद्वारे बाहेर काढले जाते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळता येते. 

3. वेलचीचे पाणी कसे तयार करावे?

वेलचीचे पाणी तयार करण्यासाठी २ वेलची रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर वेलचीच्या बिया सोलून त्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल. बिघडलेली पचनक्रिया देखील सुरळीत होईल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना