Fatty Liver: फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप जास्त वाढली आहे. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर फॅट जमा होणे आणि सूज येणे. जर वेळीच यावर उपाय केले नाही तर पुढे लिव्हर डॅमेजचा धोकाही वाढतो. फॅटी लिव्हरची समस्या झाली तर सतत कमजोरी जाणवते, पोटाच्या आजूबाजूला वेदना होतात. त्याशिवाय दम लागणे, त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा दिसणे, पायांवर सूज आणि पोटावर सूज अशीही लक्षणं दिसतात. जर आपल्याला सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या असेल तर यावर लिव्हर स्पेशलिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी काही उपाय सांगितले आहेत.
फॅटी लिव्हर कसं कराल बरं?
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या इन्सुलिन रेजिस्टेंससंबंधी असते. लिव्हर पुन्हा हेल्दी करण्यासाठीचा सगळ्यात मोठा उपाय लठ्ठपणा कमी करणं हा आहे. तसेच अल्कोहोलपासून दूर रहावे, सॅच्युरेटेड फॅट्स, काही बियांच्या तेलानं सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते.
कॉफी ठरेल रामबाण
अनेक शोधातून समोर आलं आहे की, दिवसातून १ ते २ कप कॉफी प्याल तर लिव्हर सिरोसिसचा धोका कमी होऊ शकतो. पण दिवसातून २ पेक्षा जास्त कप कॉफी पिऊ नये. दोन्ही कॉफीमधील अंतर ६ तासांचं असावं.
व्हिटामिन ई
व्हिटामिन ई ने ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. यामुळे इन्फ्लामेशन कमी होतं आणि लिव्हरवरील फॅट कमी करण्यासही मदत मिळते. यासाठी ड्रायफ्रूट्स, बिया आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
व्हिटामिन डी
व्हिटामिन डी शरीरात कमी झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. रिसर्चमधून समोर आलं आहे की, व्हिटामिन डी सप्लीमेंट्स लिव्हरचं काम सुधारू शकतात. सूर्यकिरणांच्या माध्यमातून व्हिटामिन डी मिळवू शकता.
मेडिटेरिअन डाएट
फायबर आणि अॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर असलेली मेडिटेरिअन डाएट फॅटी लिव्हर ठीक करण्यास मदत करते. तसेच या डाएटनं मेटाबॉलिक कंडीशन ठीक करण्यासही मदत मिळते.