Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोलेस्टेरॉल घरीच कमी करण्याचा बेस्ट उपाय, फक्त रोज खा 'या' मसाल्याचा एक कच्चा तुकडा!

कोलेस्टेरॉल घरीच कमी करण्याचा बेस्ट उपाय, फक्त रोज खा 'या' मसाल्याचा एक कच्चा तुकडा!

How To Reduce Cholesterol : हृदयरोग टाळण्यासाठीचा उपाय म्हणजे हाय कोलेस्टेरॉल कमी करणं. यासाठी घरातील एक मसाला तुमची मदत करू शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:15 IST2025-06-21T10:12:58+5:302025-06-21T10:15:12+5:30

How To Reduce Cholesterol : हृदयरोग टाळण्यासाठीचा उपाय म्हणजे हाय कोलेस्टेरॉल कमी करणं. यासाठी घरातील एक मसाला तुमची मदत करू शकतो. 

Dr Saleem Zaidi told best way to eat raw ginger directly to prevent heart attack | कोलेस्टेरॉल घरीच कमी करण्याचा बेस्ट उपाय, फक्त रोज खा 'या' मसाल्याचा एक कच्चा तुकडा!

कोलेस्टेरॉल घरीच कमी करण्याचा बेस्ट उपाय, फक्त रोज खा 'या' मसाल्याचा एक कच्चा तुकडा!

How To Reduce Cholesterol : जगभरात हार्ट अ‍ॅटॅक येऊन जीव जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोट्यावधी लोक हृदयरोगांचे शिकार झाले आहेत. हृदयरोगाचं एक मुख्य कारण म्हणजे हाय कोलेस्टेरॉल. ज्यामुळे हृदयाच्या नसा ब्लॉक होतात. ज्यामुळे रक्तप्रवाह योग्य पद्धतीनं होत नाही. अशात हृदयावरील दबाव वाढतो. हृदयरोग टाळण्यासाठीचा उपाय म्हणजे हाय कोलेस्टेरॉल कमी करणं. यासाठी घरातील एक मसाला तुमची मदत करू शकतो. 

आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, आल्याचा एक तुकडा ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करू शकतो. हृदयाच्या रूग्णांसाठी आलं संजीवनी ठरू शकतं. मात्र, ते योग्य पद्धतीनं खाणं महत्वाचं आहे. तेव्हाच त्याचे फायदे मिळू शकतील.

हृदय मजबूत ठेवण्यासोबतच आल्यानं पचन तंत्र मजबूत केलं जाऊ शकतं. ज्यामुळे गॅस आणि श्वासासंबंधी समस्याही होत नाही. डॉक्टर सांगतात की, हा केवळ एक मसाला नाही तर औषधी आहे. ज्यानं कोलेस्टेरॉल, बीपी कमी करून हृदयाचं काम चांगलं होऊ शकतं.

पचन होईल चांगलं

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अवेळी खाणं यामुळे अपनाची समस्या अधिक लोकांना होत असते. डॉक्टर जैदी सांगतात की, आल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. गॅस, ब्लोटिंग, अपचन या समस्याही दूर होतात. 

आलं खाण्याचे फायदे

आल्यामध्ये बायो अॅक्टिव तत्व, अॅंटी-इन्फ्लामेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सप्रमाणे काम करतात. यानं शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून बचाव केला जातो आणि डायजेशन सुधारतं.

कसं खाल आलं?

डॉक्टर सांगतात की, आलं खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. हे तुम्ही ताजं, वाळलेलं किंवा पावडरच्या रूपात खाऊ शकता. पण हे खाण्याची सगळ्यात फायदेशीर पद्धत म्हणजे चावून खाणं.

आलं चावून खाण्याचे फायदे

ताजं आलं कच्च खाल्ल्याने याचे फायदे अधिक मिळतात. यातील जिंजरोल आणि शॅगोल्स हे तत्व शरीराला थेट मिळतात. यांमध्ये कोणताही बदल किंवा प्रीजर्वेटिव नसतात. आलं चावून खाल्ल्यानं लाळेमध्ये एंझाइम्स येतात. ही पद्धत अधिक सुरक्षित मानली जाते.

Web Title: Dr Saleem Zaidi told best way to eat raw ginger directly to prevent heart attack