Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नेहमी टाइट जीन्स घालण्यानं होऊ शकतात नाजूक जागेचे आजार, जन्मभराचं दुखणं लागेल मागे

नेहमी टाइट जीन्स घालण्यानं होऊ शकतात नाजूक जागेचे आजार, जन्मभराचं दुखणं लागेल मागे

Tight Jeans : जीन्स घालणं काही वाईट नाही. पण जीन्सची योग्य निवड करणंही तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:54 IST2025-05-08T11:31:17+5:302025-05-08T14:54:17+5:30

Tight Jeans : जीन्स घालणं काही वाईट नाही. पण जीन्सची योग्य निवड करणंही तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं.

Dose wearing tight jeans increasing vagina infection risk know what expert says | नेहमी टाइट जीन्स घालण्यानं होऊ शकतात नाजूक जागेचे आजार, जन्मभराचं दुखणं लागेल मागे

नेहमी टाइट जीन्स घालण्यानं होऊ शकतात नाजूक जागेचे आजार, जन्मभराचं दुखणं लागेल मागे

Tight Jeans : आजकाल महिला, तरूणी जीन्सची पॅंट वापरतात. कारण ट्रेंडिंग फॅशन फॉलो करणं सगळ्यांनाच आवडतं. पार्टी असो, ऑफिस असो, कॉलेज असो किंवा कुठे बाहेर फिरायला जाणं असो कुठेही जाताना जास्तीत जास्त महिला जीन्स वापरतात. महत्वाची बाब म्हणजे जीन्स-टीशर्ट किंवा टॉपचा साधा सिंपल लूकही चांगला दिसतो. मात्र, जीन्समुळे आरोग्याचं काय नुकसान होऊ शकतं हे अनेकांना माहीत नसतं.

जसे की, वर सांगितले जीन्सचा वापर जास्त केला जातो. जीन्स घालणं काही वाईट नाही. पण जीन्सची योग्य निवड करणंही तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. कारण चुकीच्या जीन्समुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही नेहमीच टाइट जीन्स घालणं पसंत करत असाल तर यानं तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या (Vaginal Infection) आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. तो कसा हे जाणून घेऊ.

टाइट जीन्स घालण्याचे नुकसान

प्रसिद्ध फिटनेस कोच प्रियांक मेहता(Priyank Mehta) यांनी त्यांच्या इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यात टाइट जीन्सचे आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम सांगितले आहेत.

प्रायव्हेट पार्टचं pH बॅलन्स बिघडतं

टाइट जीन्समुळे एअर फ्लो थांबून जातो आणि त्यामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये ओलावा तसाच राहतो. अशात त्याजागी बॅक्टेरिया आणि फंगस वाढतात. व्हजायना स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी एक पीएच लेव्हल कायम ठेवत असते. पण टाइट कपड्यांमुळे पीएच लेव्हलमध्ये गडबड होते. ज्यामुळे नुकसानकारक बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका वाढतो.

कसे कपडे निवडाल?

प्रायव्हेट पार्टचं आरोग्य बिघडू नये यासाठी कॉटन किंवा इतर कोणत्याही ब्रीथेबल म्हणजे हवा केळती राहील अशा कपड्यांनी निवड करावी. सेल जीन्सची निवड करा.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कधीच टाइट जीन्स घालू नये का? तर प्रियांका यावर म्हणाल्या की, रोज टाइट जीन्स वापरू नये. कधी कधी तुम्ही याचा वापर करू शकता. यानं शरीराला आराम मिळतो आणि इन्फेक्शऩचा धोकाही कमी राहतो.
 

Web Title: Dose wearing tight jeans increasing vagina infection risk know what expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.