Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > साबणाच्या चिपट्या फेकू नका-घ्या ५ मिनिटांत सॅनिटायझर आणि हॅण्डवॉश करण्याची युक्ती, केमिकल फ्री उपाय

साबणाच्या चिपट्या फेकू नका-घ्या ५ मिनिटांत सॅनिटायझर आणि हॅण्डवॉश करण्याची युक्ती, केमिकल फ्री उपाय

Don't throw away leftover soap bars - Trick to make sanitizer and hand wash in 5 minutes, chemical-free solution : घरीच तयार करा हॅण्डवॉश आणि सॅनिटायझर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 18:11 IST2026-04-09T18:08:08+5:302026-04-09T18:11:16+5:30

Don't throw away leftover soap bars - Trick to make sanitizer and hand wash in 5 minutes, chemical-free solution : घरीच तयार करा हॅण्डवॉश आणि सॅनिटायझर.

Don't throw away leftover soap bars - Trick to make sanitizer and hand wash in 5 minutes, chemical-free solution | साबणाच्या चिपट्या फेकू नका-घ्या ५ मिनिटांत सॅनिटायझर आणि हॅण्डवॉश करण्याची युक्ती, केमिकल फ्री उपाय

साबणाच्या चिपट्या फेकू नका-घ्या ५ मिनिटांत सॅनिटायझर आणि हॅण्डवॉश करण्याची युक्ती, केमिकल फ्री उपाय

टाकाऊतून टिकाऊ तयार करण्यात भारतीय महिलांच्या कल्पकतेला तोड नाही. अन्न असो किंवा एखादी वस्तू वाया जाऊ देत नाहीत. त्याचा वापर केला जातो. घरात छोटे-छोटे उरलेले साबणाचे तुकडेही वाया जाऊ न देता त्याचा हॅण्डवॉश करता येतो. तसेच सॅनिटायझर सतत विकत घेणंही खर्चिक ठरतं. अशा वेळी घरच्या घरी हॅण्डवॉश आणि सॅनिटायझर तयार करणं हा एक सोपा, किफायतशीर आणि उपयोगी पर्याय ठरु शकतो. (Don't throw away leftover soap bars - Trick to make sanitizer and hand wash in 5 minutes, chemical-free solution)थोडीशी कल्पकता आणि साधी सामग्री वापरून आपण हे दोन्ही सहज तयार करू शकतो. काही मिनिटांचे काम आहे. 

उरलेल्या साबणाच्या तुकड्यांपासून हॅण्डवॉश तयार करणं खूप सोपं असतं. घरात जमा झालेले छोटे साबणाचे तुकडे एकत्र करून ते किसून किंवा बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर हे तुकडे गरम पाण्यात टाकून पूर्णपणे विरघळेपर्यंत ठेवावेत. मिश्रण थंड झाल्यावर ते थोडंसं घट्ट आणि जेलसारखं तयार होतं. इच्छेनुसार त्यात काही थेंब लिंबाचा रस किंवा सुगंधासाठी एखादं नैसर्गिक तेल घालू शकता. तयार झालेला हा द्रव स्वच्छ बाटलीत भरून वापरता येतो. यामुळे साबणाचा अपव्यय टळतो आणि हात स्वच्छ ठेवण्यासाठी घरचं हॅण्डवॉश तयार होतं.

तसंच, कोरफडीचा वापर करून घरच्या घरी सॅनिटायझरही तयार करता येतो. कोरफडीचा ताजा गर काढून तो चांगला गाळून घ्यावा, जेणेकरून त्यात गाठी राहणार नाहीत. या जेलमध्ये योग्य प्रमाणात अल्कोहोल (जसं की आयसोप्रोपिल अल्कोहोल) मिसळणं आवश्यक असतं, कारण त्याशिवाय सॅनिटायझर प्रभावी होत नाही. त्यात काही थेंब लिंबाचा रस किंवा आवश्यक इसेंशियल तेल घातल्यास सुगंधही येतो. हे मिश्रण चांगलं एकत्र करुन स्वच्छ बाटलीत भरावं. कोरफडीमुळे त्वचा मऊ राहते आणि अल्कोहोलमुळे जंतू नष्ट होण्यास मदत होते.

सॅनिटायझर बनवताना योग्य प्रमाण राखणं खूप महत्त्वाचं असतं. अल्कोहोलचं प्रमाण कमी असेल तर ते जंतू नष्ट करण्यात प्रभावी ठरत नाही. त्यामुळे शक्यतो ६०% पेक्षा जास्त अल्कोहोल असणं आवश्यक आहे. तसेच हे मिश्रण स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. अल्कोहोलही कोणतं वापरता ते महत्वाचं आहे. 

घरच्या घरी तयार केलेले हे हॅण्डवॉश आणि सॅनिटायझर केवळ खर्च वाचवत नाहीत, तर पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरतात. उरलेले साबण पुन्हा वापरल्याने अपव्यय कमी होतो आणि कोरफडीसारख्या नैसर्गिक घटकांमुळे त्वचेचीही काळजी घेतली जाते. थोड्या प्रयत्नांनी आपण घरातच स्वच्छता राखण्यासाठी उपयुक्त आणि नैसर्गिक पर्याय तयार करू शकतो.

Web Title : साबुन और एलोवेरा से बनाएं हैंडवॉश, सैनिटाइजर: आसान तरीका

Web Summary : साबुन के टुकड़ों से हैंडवॉश और एलोवेरा से सैनिटाइजर बनाएं। यह किफायती, पर्यावरण-अनुकूल तरीका है। अल्कोहल का सही उपयोग करें।

Web Title : DIY Handwash & Sanitizer: Recycle Soap, Use Aloe Vera

Web Summary : Make handwash from soap scraps and sanitizer with aloe vera. These eco-friendly methods save money and reduce waste. Use alcohol carefully for effective sanitization.